Premium

ऋतुराज गायकवाड व होणाऱ्या बायकोचा धोनीसह फोटो; फॅन्सना दिसला ‘हा’ भन्नाट प्रकार; म्हणाले, “म्हणून तू स्टार”

Ruturaj Gaikwad Viral Photo: “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले आहे. हा फोटो साहजिकच व्हायरल झाला होता.

Ruturaj Gaikwad To be Wife And Dhoni Post Has Secret Star Hidden On CSK Jersey Fans Stunned After IPL 2023 Finals Highlights
ऋतुराज गायकवाड व होणाऱ्या बायकोचा धोनीसह 'तो' फोटो (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ruturaj Gaikwad Jersey Viral: आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरंल. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. जडेजा जरी सीएसकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला असला तरी चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि फलंदाज ऋतुराज गायकवाड सुद्धा मॅचनंतर विशेष चर्चेत आला आहे. ऋतुराजने होणारी पत्नी व कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यासह खास फोटो पोस्ट केला होता. “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले आहे. हा फोटो साहजिकच व्हायरल झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋतुराजची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर काही सीएसकेच्या काही चाहत्यांना यामध्ये एक हटके बाब दिसून आली आहे. सीएसकेची जर्सी जर आपण नीट पाहिली असेल तर त्यात एका बाजूला चार स्टार मार्क दिसत आहेत. पण ऋतुराजने घातलेली सीएसकेची जर्सी आपण पाहिली तर त्यात चार ऐवजी पाच स्टार मार्क दिसत आहेत. काही फॅन्सनी म्हंटल्याप्रमाणे ऋतुराजने सीएसके पाचव्यांदा आयपीएल जिंकल्यावर ऋतुराजने हायलाईटरने हा स्टार आपल्या जर्सीवर काढला होता.

ऋतुराजची होणाऱ्या बायको व माहीसह खास पोस्ट

दरम्यान, ऋतुराज व उत्कर्षा दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे मात्र अद्याप याबद्दल ऋतुराजने अधिकृत माहिती दिलेली नाही. दुसरीकडे या सामन्यांनंतर ऋतुराजने “हा विजय खूपच खास होता कारण ज्या प्रकारे आम्ही कमबॅक केला, जसे सामने जिंकलो ते खास ठरले. हा विजय आम्ही रायडूला समर्पित कर आहोत.” अशी प्रतिक्रिया दिली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ruturaj gaikwad to be wife and dhoni post has secret star hidden on csk jersey fans stunned after ipl 2023 finals highlights svs