Sachin Tendulkar X Post On IPL Champion RCB: मंगळवारी (३ जून) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जला पराभूत करत इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद जिंकले. यासह आयपीएलला ८ वा विजेता मिळाला आहे.

आरसीबीच्या या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून संघाचे अभिनंदन केले आहे. आपल्या पोस्टमध्ये सचिन म्हणाला की, “रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाबद्दल अभिनंदन. १८ क्रमांकाच्या जर्सीने आयपीएलच्या १८ व्या हंगामाची ट्रॉफी जिंकली.”

यावेळी सचिनने उपविजेत्या पंजाब किंग्सचेही कौतुक केले आहे. तो म्हणाला, “पंजाब किंग्सनेही उत्तम खेळ केला.”

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले. चौथ्यांदा अंतिम सामना खेळणाऱ्या बंगळुरूने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. दरम्यान १७ धावांत २ बळी घेणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने कोहलीच्या ४३ धावांच्या संथ खेळीच्या जोरावर २० षटकांत ९ गडी बाद १९० धावा केल्या. पंजाबकडून जेमिसन आणि अर्शदीप सिंग यांनी ३-३ विकेट्स घेतल्या.

आरसीबीला पहिला धक्का काइल जेमिसनने दिला त्याने फिल सॉल्टला १९ धावांवर केले. यानंतर युजवेंद्र चहलने आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्याने २४ धावांवर मयंक अग्रवालला केले. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने २६, लिव्हिंगस्टोनने २५ तर जितेश शर्माने २४ धावा केल्या. आरसीबीच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकांत ७ गडी बाद १८४ धावा करता आल्या. पंजाबकडून शशांक सिंहने ६१ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरूच्या विजयानंतर मंगळवारी रात्री कर्नाटकमध्ये अक्षरश: दिवाळी साजरी झाली. आयपीएलच्या अंतिम सामन्यात कधीही विजेतेपद न मिळवलेले दोन संघ खेळत होते. त्यामुळे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आरसीबी २०० धावांचा टप्पा सहज पार करेल असं वाटत असतानाच शेवटच्या तीन षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि आरसीबीला १९० धावांवर रोखण्यात पंजाबला यश आलं, मात्र पंजाबला या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नाही.