Sachin Tendulkar Shared Instagram Post About Shubman Gill : संपूर्ण क्रिडाविश्वात धावांचा पाऊस पाडून मैदान गाजवणारा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडून कौतुकाची थाप मिळणे, म्हणजे क्रिकेटर्ससाठी एक पर्वणीच असते. आयपीएल २०२३ मध्ये सुपरस्टार बनलेला टीम इंडियाचा आणि गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुबमन गिलनं सचिनला इम्प्रेस केलं आहे. शुबमनच्या चमकदार कामगिरीवर सचिनने स्तुतीसुमने उधळली आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात शुबमनने तीन शतक ठोकून इतिहास रचला आहे. मैदानात शुबमन चौकार षटकारांचा पाऊस पाडून गुजरात टायटन्सच्या गळ्यात विजयाची माळ घालत आहे. शुबमनच्या या अप्रतिम फलंदाजीबाबत क्रिडाविश्वातील दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. आता सचिन तेंडुलकरनेही इन्साग्रामवर अकाऊंटवर शुबमनविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सचिननं म्हटलंय, “यावर्षीच्या आयपीएल हंगामात शुबमन गिलने केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. सलग दोन शतक ठोकून शुबमनने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एका शतकामुळं मुंबई इंडियन्सच्या आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या आशेवर पाणी फेरलं. तर दुसऱ्या शतकामुळं गुजरातने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. क्रिकेट अनिनिश्चिततेचा खेळ आहे, हे यावरू स्पष्ट झालं. शुबमनचा फलंदाजी करतानाचा स्वभाव, अतूट शांतता, धावांची भूख आणि धावा काढण्याची चपळता, शुबमनच्या या गुणांनी मला इम्प्रेस केलं.

नक्की वाचा – CSK च्या प्रशिक्षकानं गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहराला दिला इशारा, म्हणाला, ” त्यांचा आदर खूप करतो पण…”

हाय स्कोरिंग सामन्यात अनेक चढ उतार येतात. पण गुजरात टायटन्ससाठी १२ व्या षटकानंतर शुबमन धावांचा पाऊस पाडतो आणि धावफलकावर संघासाठी मोठी धावसंख्या उभारतो. मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात त्याने त्याच्या क्षमतेचा दाखला दिला. मुंबईनंही कमबॅक केलं होतं. तिलक वर्माने मोहम्मद शमीला एका षटकात २४ धावा कुटल्या होत्या. सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर असेपर्यंत मुंबईच्या सामना जिंकण्याच्या आशा जिवंत होत्या.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar praises shubman gill because of his outstanding batting and smashes three tons in ipl 2023 mumbai indians nss
First published on: 28-05-2023 at 18:09 IST