Sanjay Manjrekar’s prediction about RCB: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलचा १६वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे.. ही स्पर्धा अतिशय रोमांचक होणार असून यामध्ये अनेक संघांमध्ये निकराची लढत पाहायला मिळणार आहे. स्पर्धेला अद्याप सुरूवात झालेली नाही आणि विजेते आणि प्लेऑफ संघांबद्दल अनेक तज्ञ आधीच अंदाज बांधत आहेत. अशात माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी आरसीबी संघाबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी इंडियन प्रीमियर लीग २०२३ चे प्लेऑफ संघ आणि विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मोठी भविष्यवाणी केली आहे. संजय मांजरेकर यांच्या मते, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स, महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि केएल राहुलची लखनऊ सुपर जायंट्स या वर्षी प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील.

IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
Ricky Ponting Argued With Umpire
IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

विराट कोहलीचा संघ आयपीएल जिंकू शकेल का?

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मधील सर्वात प्रसिद्ध संघ आरसीबीचे चाहते गेल्या १५ वर्षांपासून ट्रॉफीची वाट पाहत आहेत. आरसीबीने प्रत्येक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, परंतु अद्याप त्यांना ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत, ईएसपीएन क्रिकइन्फोवरील चर्चेदरम्यान संजय मांजरेकर आरसीबीबद्दल एक भाकीत केलं आहे.

हेही वाचा – IPL 2023: अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणावर रोहित शर्माची महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘अपेक्षा…’

ईएसपीएनवर प्रश्न विचारण्यात आला होता की, विराट कोहलीचे यंदाच्या मोसमात ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होईल का? त्याला उत्तर देताना मांजरेकर म्हणाले, “होय, विराट कोहलीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न यावेळी पूर्ण होईल, असे मला वाटते. त्यांच्याकडे अप्रतिम गोलंदाजी आक्रमण आहे. जर फाफ डू प्लेसिसने धावा केल्या तर त्यांना चांगली संधी असेल.”

आयपीएल २०२३चा आरसीबी संघ:

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल