scorecardresearch

Shikhar Dhavan: रोहित – विराट यांच्यात मतभेद? शिखर धवनने केलं गुपित उघड, पुनरागमनावरही केलं भाष्य

Ego Clash in Cricketers: भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि सुपरस्टार फलंदाज विराट कोहली यांच्यातील मतभेदाच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. याप्रकरणी धवनने गुपित उघड केलं आहे.

Shikhar Dhavan: Ego between Rohit and Virat Legendary player Shikhar Dhawan made a secret big statement on his comeback
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Rohit-Virat Rift: सलामीवीर शिखर धवन सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे. ३७ वर्षीय धवनने डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. धवन आता आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जसाठी शानदार खेळी करण्यासाठी तो सज्ज आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी, धवनने २५ मार्च (शनिवार) रोजी खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना संघातील अनेक रहस्य उलगडले आहेत.

भारतीय संघात अनेक दिग्गज एकत्र खेळले आहेत. सचिन तेंडुलकरच्या काळात अनेक सुपरस्टार होते आणि आता विराट कोहली आणि रोहित शर्माच्या काळात अनेक मोठे क्रिकेटपटू आहेत. अशा स्थितीत भारतीय संघात इगो क्लॅशची काही चर्चा आहे का? शिखर धवनने यावर आपले मत मांडले आहे. जेव्हा शिखर धवनला सध्याच्या भारतीय संघातील अशा मुद्द्यांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “अहंकार ही गोष्ट खूप वाईट आहे पण त्यातून संघर्ष होणे ही ‘मानवी गोष्ट’ आहे.”

हेही वाचा: IPL vs WPL: धोनीच्या सीएसकेशी जुळणारे मुंबई इंडियन्सचे ‘हे’ आकडे तर दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने काय आहे इतिहास? जाणून घ्या

विराट-रोहितवर केले मोठे विधान

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवनने इगो क्लॅशच्या प्रश्नावर सांगितले की, “अहंकार असणे ही अतिशय मानवी आणि सामान्य गोष्ट आहे. एका वर्षात आम्ही (सुमारे) २२० दिवस एकत्र राहतो. कधीकधी लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात, आमच्याबाबतही असेच आहे. मी रोहित शर्मा किंवा विराट कोहली बद्दल बोलत नाहीये, ही एक सामान्य गोष्ट आहे.” हा प्रश्न त्याला विराट-रोहितबाबत विचारण्यात आला होता. सलामीवीराने या विषयावर चर्चा करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील अहंकाराच्या संघर्षाला नाकारले नाही, परंतु ते थेट कबूलही केले नाही. तो म्हणाले की, “ते एकत्र खेळतात आणि अशा प्रसंगी असे मुद्दे समोर येतात की सर्व सहमती नाही होऊ शकत पण परिस्थिती सुधारते. दोन्हीही तसे एकमेकांना सांभाळून घेतात.” असे म्हणत त्याने उत्तर टाळले.

धवन पुढे म्हणाला, “आमच्याकडे ४० सदस्यांची टीम आहे, ज्यामध्ये सपोर्ट स्टाफ आणि मॅनेजर यांचा समावेश आहे. काही संघर्ष कालांतराने होऊ शकतात जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत आनंदी नसता तेव्हा असे घडते. असे का नाही घडावे? अशी चर्चा झाल्याने संघातील वातावरण देखील चांगले राहते. जेव्हा परिस्थिती सुधारते तेव्हा प्रेम देखील वाढते.” धवन आता पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार असून तो कर्णधारही असेल.

हेही वाचा: Virat Kohli: चर्चा तर होणारच! इयत्ता नववीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत किंग कोहलीबद्दल विचारण्यात आला प्रश्न, सोशल मीडियावर व्हायरल

शुबमन गिलच्या खेळीवर खुश आहे धवन

गब्बर धवन पुढे म्हणाला, “करिअरमध्ये संघाचे नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट आहे. मी काही टप्प्यावर ३-४ संघांचे नेतृत्व केले आहे, ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या करिअरमध्ये ही नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येत असतात.गेली एक-दोन वर्षे मी एकच फॉरमॅट खेळत होतो. तर शुबमन दोन फॉरमॅटमध्ये खेळत होता. शुबमन गिल खूप चांगली कामगिरी करत आहे आणि मी त्याच्या फलंदाजीवर खूप आनंदी आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 16:58 IST

संबंधित बातम्या