शोएब अख्तर म्हणतो “गुजरात टायटन्सला धूळ चारा,” राजस्थान रॉयल्सला दिला पाठिंबा, कारण आहे खास!

राजस्थान रॉयल्सलने शेन वॉर्नला श्रद्धांजली म्हणून आजच्या अंतिम सामन्यावर आपले नाव कोरावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

shoaib akhtar and rajasthan royals
शोएब अख्तर आणि राजस्थान रॉयल्स (संग्रहित फोटो)

अवघ्या काही तासांत आयपीएलच्या अंतिम लढतीला सुरुवात होणार आहे. या लढतीत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघ तूल्यबळ असल्यामुळे कोणाचा विजय होणार हे स्पष्टपणे सांगत येत नाहीये. मात्र क्रिकेटचे जाणकार आणि विश्लेषक वेगवेगळे ठोकताळे बांधत आहेत. तसेच काही आजी-माजी क्रिकेटपटू कोणता संघ जिंकणार? याबद्दल भाकित करताना दिसत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने तर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायन्सला धूळ चारावी अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. अख्तर राजस्थान संघाच्या बाजूने उभा ठाकला असून त्याला विशेष असे कारण आहे.

हेही वाचा>>> ‘जोसभाईने ८०० केल्या, मी असतो तर १६०० धावा कुटून आलो असतो,’ RR च्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा

शेन वॉर्नला श्रद्धांजली म्हणून राजस्थान रॉयल्सलने आजच्या अंतिम सामन्यावर आपले नाव कोरावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. “आयपीएलमध्ये सुरुवातीला काहीसं कंटाळवणं वाटत होतं. नंतर मात्र तीव्र स्पर्धा होती. राजस्थान रॉयल्स हा संघ १४ वर्षांनतर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला आहे. त्यामुळे यावेळी राजस्थानने शेन वॉर्नला स्मरणात ठेवावे. शेन वॉर्न हरभजन सिंग तसेच मला खूप आवडायचा. शेन वॉर्नची आठवण म्हणून राजस्थान रॉयल्स संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभूत करावे,” असे शोएब अख्तर म्हणाला आहे.

हेही वाचा>>> IPL 2022 Final GT vs RR : मोदी लावणार आयपीएल फायननला हजेरी? चर्चांना उधाण, अहमदाबादेत ६००० पोलीस तैनात

दरम्यान, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज रात्री आठ वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लढत होणार आहे. ही लढत पाहण्यासाठी बॉलिवुडमधील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाचा विजय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shoaib akhtar said rajasthan royals should win in remember of shane warne prd

Next Story
IPL 2022 Final : अंतिम सामन्यापूर्वी आयपीएल प्रसारकांवर संजू सॅमसनची पत्नी झाली नाराज, जाणून घ्या कारण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी