Doubts over Ben Stokes’s play against MI: इंडियन प्रीमियर लीग २०२३ (आयपीएल २०२३) मध्ये शनिवारी दुसरा सामना मुंबई इंडियन्स (एमआय) आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) यांच्यात होणार आहे. वानखेडेवरील या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू बेन स्टोक्सला दुखापत झाल्याने या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रानंतर स्टोक्सची टाच दुखू लागली. त्यामुळे त्याला दहा दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

सीएसकेचे वैद्यकीय पथक अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शनिवारी दुपारी बेन स्टोक्सच्या दुखापतीचे मूल्यांकन करेल. मात्र, तो सामना खेळण्याचा धोका पत्करणार नसल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या मिनी लिलावात सीएसकेने स्टोक्सला १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. इंग्लंडचा हा अष्टपैलू खेळाडू या मोसमात दोन सामने खेळला आहे. तो गुडघ्याला दुखापत असताना देखील भारतात आला आहे.

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: …आणि रोहित शर्मा पंड्याला म्हणाला, “कोण? मी?”, हार्दिकच्या ‘या’ कृतीवर चाहत्यांचा संताप; पाहा नेमकं काय घडलं मैदानात!

हेही वाचा – IPL 2023 MI vs CSK: सीएसकेच्या ‘या’ गोलंदाजासमोर सूर्यकुमारने नेहमीच टाकली आहे नांगी, पाहा दोघांमधील हेड टू हेड आकडेवारी

बेन स्टोक्स कर्णधार महेंद्रसिंग धोनीची जागा घेणार का?

अष्टपैलू मोईन अलीला विचारण्यात आले की, तो एमएस धोनीच्या जागी सीएसकेचा भविष्यातील कर्णधार म्हणून त्याचा इंग्लंडचा सहकारी स्टोक्स पाहतो का? तो म्हणाला, “तो आनंद घेत आहे. सीएसके ही एक प्रकारची फ्रँचायझी आहे, ज्यात सामील होण्यात तुम्हाला आनंद आहे. त्यामुळे तुम्हाला या फ्रँचायझीसाठी खेळायला आवडते. तो संघात मिसळला आहे. त्याच्या अनुभवाने तो संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे.”

मुंबई विरुद्ध चेन्नई आकडेवारी –

आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी २० सामने मुंबईने तर १४ सामने चेन्नईने जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील वानखेडेवर दोन्ही संघ १० वेळा भिडले आहेत. सात सामने मुंबईने तर तीन सामने चेन्नईने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबईने तीन आणि सीएसकेने दोन जिंकले आहेत.

हेही वाचा – IPL 2023 MI vs CSK: चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाला मोठा धक्का; ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाज महत्त्वाच्या सामन्याला मुकणार?

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शिवम दुबे, मिचेल सँटनर/सिसंड मगला, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन/ट्रिस्टन स्टब्स, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान.