श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्यापासून रोखण्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळावरील दबाव वाढत आहे. परंतु खेळाडूंना थांबविण्याच्याबाबतीत आपण हतबल असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
‘‘आम्ही खेळाडूंना आयपीएलसाठी भारतात जाऊ नका, असे र्निबध घालू शकत नाही,’’ असे श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सचिव निशांता राणातुंगा यांनी सांगितले. बुद्धिस्ट नॅशनलिस्ट ग्रुपने गेल्या आठवडय़ात क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात जाण्यापासून रोखण्यासंदर्भात श्रीलंका क्रिकेट मंडळाविरोधात एक विनंती केली होती. तामिळनाडूत श्रीलंकेच्या खेळाडूंचे सामने नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खेळाडूंना कुठेही जाता येईल, असे श्रीलंकेमधील सरकारने स्पष्टीकरण दिले होते. रावण दलानेही श्रीलंका क्रिकेट मंडळाला खेळाडूंनी बहिष्कार टाकण्यासंदर्भात इशारा दिला आहे. जर खेळाडू भारतात गेले तर आम्ही आमचा लढा तीव्र करू, असे त्यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंना आपल्या राज्यात प्रवेशासाठी बंदी घातली आहे. याचा निषेध म्हणून श्रीलंकेच्या खेळाडूंनी आयपीएल खेळू नये, असे रावण दल आणि राष्ट्रीय भिक्षू महासंघ यांनी इशारा दिला आहे. न्यूवान कुलसेकरा आणि अकिला धनंजय या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्जमधून वगळण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर तामिळनाडूमध्ये श्रीलंकाविरोधी शक्ती कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेच्या दोन खेळाडूंना चेन्नईच्या संघातून वगळणे, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे श्रीलंकेने भारतात आयपीएल खेळण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन राणातुंगा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंडीमलने आयपीएलची ‘ऑफर’ फेटाळली
कोलंबो : भारतात होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळण्याबाबतची ‘ऑफर’ श्रीलंकेचा ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार दिनेश चंडीमल याने फेटाळून लावली आहे. आयपीएलकरिता लिलाव करणाऱ्या श्रीलंकेच्या १३ खेळाडूंमध्ये चंडीमलचा समावेश नव्हता. मात्र तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून केविन पीटरसनऐवजी खेळणार असल्याचे समजले होते. पीटरसन हा दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. चेन्नई येथील सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी भाग घेऊ नये असे आवाहन लंकेच्या क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंना केले आहे. त्याखेरीज अनेक राष्ट्रीय संस्थांनीही लंकेच्या खेळाडूंनी स्पर्धेतूनच माघार घ्यावी असे आवाहन केले होते. त्या पाश्र्वभूमीवर चंडीमलची माघार ही आयपीएलच्या संयोजकांना धक्का देणारी आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चमूत मुरलीधरन सामील
बंगळुरू : श्रीलंकेच्या खेळाडूंच्या सहभागाचा वाद चिघळत असताना महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चमूत सामील झाला आहे. ३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या पाश्र्वभूमीवर सध्या या संघाचा बंगळुरूमध्ये सराव सुरू आहे. २०११मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या या ४० वर्षीय ऑफ-स्पिनरने शनिवारी डावखुरा फिरकी गोलंदाज मुरली कार्तिकसोबत नेट्समध्ये टिच्चून गोलंदाजी केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrilankan people put preasure to bycott on ipl
First published on: 31-03-2013 at 02:26 IST