आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती अटीतटीच्या होत आहेत. मात्र या हंगामात खेळादरम्यान अनेक खेळाडू जखमी होत आहेत. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरदेखील पुन्हा एकदा जखमी झाला आहे. तो ज्या हाताने गोलंदाजी करतो, त्याच हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली असून हा अष्टपैलू खेळाडू आगामी सामना खेळू शकणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा >> ‘मोहसीनची गोलंदाजी पाहून मोहम्मद शमी झाला होता खूश, म्हणाला माझ्यापेक्षा..,’ प्रशिक्षकाने सांगितली आठवण

हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे सुरुवातीचे तीन सामने खेळू शकला नव्हता. त्यानंतर गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात त्याने या हंगामातील पहिला सामना खेळला. मात्र रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळताना क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताला जखम झाली. विशेष म्हणजे तो ज्या हाताने गोलंदाजी करतो, त्याच हाताला दुखापत झाल्यामुळे तो आगमी सामने खेळण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. चेन्नईविरोधात खेळताना हैदराबादचा १३ धावांनी पराभव झाला होता. तो फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करु शकला नाही. फक्त दोन चेंडू खेळून तो तंबुत परतला.

हेही वाचा >> IPL 2022 KKR vs RR : आज कोलकाता-राजस्थान आमनेसामने, कोणाचा होणार विजय? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

“वॉशिंग्टन सुंदरच्या ज्या हाताला जखम झाली होती, त्याच हाताला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. तो पूर्णपणे बरा झाला होता. मात्र पुन्हा एकदा त्याला दुखपत झाली आहे,” असे मुडी यांनी सांगितले. तसेच दुखापत झाल्यामुळे तो गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हता. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज आहे. मात्र ऐनवेळी तो जखमी झाल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसला,” असेदेखील मुडी यांनी सांगितले.

हेही वाचा >> SRH vs CSK : उमरान मलिकने टाकला IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू; गायकवाडने ठोकला षटकार, पहा VIDEO

दरम्यान, सुरुवातीला सलग पाच विजय नोंदवल्यानंतर हैदराबदचा चेन्नई आणि गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. हैदराबादची पुढील लढत गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.