आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहे. या सामन्यात काही खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने तर सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. दरम्यान, उमरान मलिकची आयपीएलमधील कामगिरी पाहून त्याला लवकरच इंडियन टीममध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. इनसाईड स्पोर्ट या क्रीडाविषयक वृत्तस्थळाने याबाबत अधिकची माहिती दिली आहे.

हेही वाचा >> IPL 2022, LSG vs RCB : बंगळुरु- लखनऊ यांच्यातील लढत फॅफ डू प्लेसिससाठी ठरणार खास, आजच्या सामन्याचं ‘हे’ आहे महत्त्व

आगामी काळात जून महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी उमरान मलिकची निवड केली जाऊ शकते. तसे संकेत बीसीसीआयच्या निवड समितीतील एका सदस्याने दिले आहेत. सनरायझर्स हैदराबादने खेळलेल्या आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिकने नऊ विकेट्स घेतलेल्या आहेत. तो 150 किमी प्रतितास या वेगाने गोंलदाजी करतोय. त्याच्या वेगापुढे दिग्गज फलंदाजांनी हात टेकले आहेत. उमरानच्या चेंडूचा सामना कसा करावा हे अजूनही अनेक फलंदाजांना उमगलेले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या केकेआरच्या श्रेयस अय्यरला त्याने थरारक पद्धतीने बाद केले. याच कारणामुळे त्याला भारताच्या क्रिकेट संघात स्थान दिले जाऊ शकते.

हेही वाचा >> RR vs KKR : पती युजवेंद्र चहलच्या हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्रीचं भन्नाट सेलिब्रेशन, प्रेक्षक गॅलरीतील व्हिडीओ व्हायरल

“उमरान मलिकसारखी वेगवान गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक गोलंदाजामध्ये विशेष कौशल्य आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीने प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. त्यामुळे निवड समितीचे उमरान मलिकच्या खेळाकडे विशेष लक्ष असणार आहे. तो निवड समितीच्या रडारवर असेल,” असे निवड समितीतील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

हेही वाचा >> Shreyas Iyer : केकेआरच्या श्रेयस अय्यरवर तरुणी फिदा, हातात पोस्टर घेत विचारले लग्न करशील का ?

दरम्यान, सध्या उमरान मलिक खेळत असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. हैदराबादने सहापैकी चार सान्यांत विजय संपादन केला असून दोन सामन्यांमध्ये हैदरबादचा पराभव झालेला आहे.