Sunil Gavaskar Statement On Hardik Pandya : टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचं कौतुक करत म्हटलं की, तो संघात ज्या प्रकारची वातावरण निर्मिती करतो, ते पाहून महेंद्र सिंग धोनीची आठवण येते. पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. शुक्रवारी गुजरातने पाचवेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव केला. हार्दिक धोनीचा खूप मोठा चाहता असल्याचं नेहमीच सांगतो, असं गावसकरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

गावसकर पुढं म्हणाले, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स जेव्हा नाणेफेक करण्यासाठी मैदानात उतरतील, त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य असेल आणि हे खूप मैत्रीपूर्ण वातावरणात होईल. पण सामन्यात वेगळी परिस्थिती असेल. कमी वेळात खूप काही शिकलो, हे सिद्ध करण्याची संधी हार्दिक पांड्याकडे आहे. गतवर्षी जेव्हा हार्दिक पांड्याने पहिल्यांदा कॅप्टन्सी केली, तेव्हा कुणी विचारही केला नसले की, त्याच्याकडून काय अपेक्षा करायला पाहिजेत. कारण तो पहिल्यापासून खूप रोमांचक क्रिकेटर आहे. पण मागील एक वर्षापासून आम्ही पाहिलं की, संघात तो ज्या प्रकारे वातावरणनिर्मिती करत आहे, ते पाहून धोनीची आठवण येते. सीएसकेप्रमाणेच हा आनंदात राहणारा संघ आहे. याचं सर्व श्रेय हार्दिकला जात आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

नक्की वाचा – Video: गौतम गंभीर सचिन तेंडुलकरला भेटला अन् ‘कोहली कोहली’च्या घोषणांनी मैदान दुमदुमला, दिग्गजांची रिअ‍ॅक्शन Viral

गावसकर यांनी गुजरात टायटन्सच्या यशामागे प्रशिक्षक आशिष नेहराचाही मोठा वाटा असल्याचं म्हटलं, ते म्हणाले, मी नेहरालाही श्रेय देतो. तो असा व्यक्ती आहे, तुम्ही ड्रेसिंग रुममध्ये असा किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तो तुम्हाला हसवत राहणार. चो जीवन खूप सरळ बनवतो आणि त्याला क्रिकेटबद्दल खूप ज्ञान आहे. टायटन्स जबरदस्त संघ आहे आणि लीगमध्ये अव्वल स्थानी राहिली आहे. चेन्नईपेक्षा त्यांचे तीन अंक जास्त होते. लीगमध्ये चांगलं प्रदर्शन करूनच ते फायनलमध्ये पोहोचले आहेत. चेन्नईला माहित आहे, त्यांच्यासमोर गुजरातचं मोठं आव्हान असणार आहे.

Story img Loader