Sunil Gavaskar praises Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२३ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. मंगळवारी (९ मे) आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने आपल्या संघासाठी सामना जिंकून देणारी खेळी साकारली. २००० धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने सूर्याच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर अवघ्या ९९ चेंडूत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. यानंतर भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी सूर्याच्या या खेळीवर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.

सूर्यकुमार यादवच्या या शानदार खेळीबद्दल बोलताना भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर म्हणाले की, अशी फलंदाजी करताना तो तुम्हाला गल्ली क्रिकेटची अनुभूती देतो. सूर्याने २०६.०६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत एकूण ८ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

सूर्याच्या खेळीबद्द्ल बोलताना सुनील गावसकर म्हणाले, ”तो गोलंदाजांसोबत खेळत होता. जेव्हा तो अशी फलंदाजी करतो, तेव्हा तो तुम्हाला गल्ली क्रिकेटची अनुभूती देतो. सराव आणि कठोर परिश्रमाने तो अधिक चांगला बनला आहे. त्याचा तळाचा हात खूप मजबूत आहे, जो तो परिपूर्णतेने वापरतो. आरसीबीविरुद्ध, त्याने लाँग ऑन आणि लाँग ऑफच्या दिशेने फटके मारून सुरुवात केली आणि नंतर मैदानात सर्वत्र शॉट्स खेळले.”

हेही वाचा – MI vs RCB: रोहित शर्माने नोंदवला अतिशय लाजिरवाणा विक्रम; संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

बंगळुरूच्या गोलंदाजांनी सूर्याविरुद्ध योजना आखली होती –

सूर्या सामन्यानंतर म्हणाला, “ते एक योजना आखून आले होते. त्यांना वाटतं होते, मी मोठ्या भागात खेळावे. त्यानी वेग कमी केला आणि हळू गोलंदाजी केली. मी नेहलला वेगाने आणि गॅपमध्ये मारून जोरात पळायला सांगितलं. तुमचा सराव तुम्हाला सामन्यांमध्ये करायचा आहे तसाच असावा. माझ्या धावा कुठे आहेत हे मला माहीत आहे. आमच्याकडे ओपन नेट सेशन आहे. मला माझा खेळ माहित आहे. मी काही वेगळे करत नाही.”

हेही वाचा – MI vs RCB: सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये केला खास कारनामा; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला १६वा भारतीय खेळाडू

सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या आणि सामना सहा गडी राखून जिंकला.