T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ मध्ये शतक आणि आयपीएलच्या इतिहासात हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूने ट्वेन्टी२० वर्ल्डकप न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी लवकरच संघांची घोषणा होणार आहे, मात्र त्याआधीच केकेआरचा खेळाडू आणि वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज खेळाडू सुनील नारायणने विश्वचषक खेळण्यास नकार दिला आहे. त्याने आपण विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे आणि विश्वचषक का खेळणार नाही, याचे कारणही दिले आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धा ही वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होऊ शकतो. याबाबत वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनला विश्वचषक संघाचा भाग होण्यासाठी विनंती केली होती.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Jake Fraser Mcgurk Statement on Jasprit Bumrah
IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO

सुनील नारायणने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिजच्या अनेक खेळाडूंची इच्छा होती की त्याने निवृत्तीतून पुनरागमन करावे आणि विश्वचषक खेळावा, मात्र सुनील नरेनने यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याने विश्वचषक संघाचा भाग नसल्याचीही पुष्टी केली आहे. यामुळे वेस्ट इंडिज संघासह करोडो चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट करत नारायण म्हणाला, ‘मी खरोखर आनंदी आणि कृतज्ञ आहे की माझ्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आणि मी माझ्या निवृत्तीतून पुनरागमन करत आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. पण मी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही, ते दरवाजे आता बंद झाले आहेत. जूनमध्ये वेस्ट इंडिजसाठी जो संघ उतरेल त्यांनी मी पाठिंबा देईन. अलीकडच्या काळात मेहनत घेतलेल्या खेळाडूंना वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळावी आणि त्यांनीही चाहत्यांना दाखवून द्यावे की तेही विश्वचषकाचे जेतेपद पटकावू शकतात. मी सर्वांना टी-२० विश्वचषकासाठी शुभेच्छा देतो.’

सुनीलची आयपीएलमधील शानदार कामगिरी पाहता तो यंदाचा विश्वचषक खेळेल अशी चर्चा होती, पण त्याच्या या पोस्टने चर्चांना पूर्णविराम लावला आहे.