T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ मध्ये शतक आणि आयपीएलच्या इतिहासात हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूने ट्वेन्टी२० वर्ल्डकप न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी लवकरच संघांची घोषणा होणार आहे, मात्र त्याआधीच केकेआरचा खेळाडू आणि वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज खेळाडू सुनील नारायणने विश्वचषक खेळण्यास नकार दिला आहे. त्याने आपण विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे आणि विश्वचषक का खेळणार नाही, याचे कारणही दिले आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धा ही वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होऊ शकतो. याबाबत वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनला विश्वचषक संघाचा भाग होण्यासाठी विनंती केली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil narine denied to play t20 wc 2024 from west indies said that door is now closed kkr ipl 2024 bdg
First published on: 23-04-2024 at 13:12 IST