scorecardresearch

Premium

…अन् सनरायझर्स हैद्राबादची मालकीण काव्या मारन कॅमेरामनवर भडकली, १९ व्या षटकात नेमकं काय घडलं? पाहा Video

Kaviya Maran Video Viral On Social Media : काव्याने दिलेली रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली असून इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

Kaviya Maran Angry Reaction Video Viral
काव्या मारनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. (Image-Social Media)

Kaviya Maran Viral Video : आयपीएलच्या १६ व्या हंगामात एकाहून एक जबरदस्त सामने पाहायला मिळत असून नवनवीन व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सनरायझर्स हैद्राबादने आतापर्यंत तीन सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या १४ व्या सामन्यात एडन मार्करच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैद्राबाद संघाने पंजाब किंग्जचा पराभव केला. परंतु, या सामन्यात एक जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला.

पंजाब किंग्जची फलंदाजी सुरु असताना १९ व्या षटकात कॅमेरामनने सनरायझर्स हैद्राबाद संघाची मालकीन काव्या मारनला मोठ्या स्क्रीनवर दाखवलं. पण काव्याला कॅमेरामनची ही कृती अजिबात आवडली नाही. काव्याने कॅमेरामनवर संताप व्यक्त करत ‘हट रे’ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली. काव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काव्याने दिलेली रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली असून इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

woman makes jugaad drum out of steel waste gives heartwinning performance watch video viral
जुगाडमधून महिलेने बनवला ढासू ड्रम सेट; तिचा परफॉर्मन्स Video पाहून युजर्स म्हणाले, “भारी टॅलेंट…”
Tilak Verma's celebration after scoring a half century celebration
Asian Games: तिलक वर्माने आईला दिलेले वचन केले पूर्ण, जाणून घ्या जर्सी वर करून का केले सेलिब्रेशन? पाहा VIDEO
tiger most trending video
स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची हौस पडली महागात, अचानक पाठीमागून आला वाघ…, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल
a old man disco dance video
आजोबांचा डिस्को डान्स पाहिला का? अतरंगी डान्स स्टेप्स अन् भन्नाट हावभाव; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

नक्की वाचा – पराभव झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन भडकला, संघाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाला, “अशा खेळपट्टीवर…”

पंजाब किंग्जने २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेले हैद्राबादचे फलंदाज मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रुक स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार एडन मार्करमे सावध खेळी करत संघाचा डाव सावरला. त्रिपाठीने ७४ धावा केल्या. तर मार्करम ३७ धावांवर नाबाद राहिला. या धावांच्या जोरावर हैद्राबाने आयपीएल २०२३ मधील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunrisers hyderabad owner kaviya maran gets angry on cameraman video clip went viral on twitter srh vs pbks nss

First published on: 10-04-2023 at 12:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×