Mumbai Indians Players Singing Video Viral : आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाली आहे. मुंबईचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्सविरोधात होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत खेळाडू एका लोकप्रिय सोशल मीडिया ट्रेंडला फॉलो करत हिंदी गाणी गात आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनेही ठेका धरला अन् एकच हशा पिकला. या खेळाडूंचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मुंबई आणि लखनऊचा संघ २४ मे ला चेन्नईत एलिमिनेटर सामना खेळणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करेल आणि पराभव झालेल्या संघाचा आयपीएलचा प्रवास संपेल. या हाय वोल्टेज सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी धमाल केली. रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरासह अन्य खेळाडू एक सोशल मीडिया ट्रेंडला फॉलो करत होते. या ट्रेंडमध्ये हे खेळाडू ‘सइयां’ गाण्याचे बोल गाण्याचा प्रयत्न करतात.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Rohit Sharma's reaction to Dhoni Karthik
MS Dhoni : ‘धोनी अमेरिकेला येत आहे पण…’, टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा मोठा खुलासा
Mohammad Nabi's Son Video Viral
IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT: ‘पहिल्या चेंडूवर सिक्स मारतो’ समीर रिझवीने भावाला दिलं होतं वचन, व्हीडिओ व्हायरल

नक्की वाचा – WTC फायनलसाठी टीम इंडिया सज्ज, अनेक खेळाडू इंग्लंडला रवाना, पण ‘हे’ दिग्गज अजूनही भारतात, कारण…

इथे पाहा व्हिडीओ

या गाण्यांच्या मैफलित नेहालने सर्वात आधी ठेका धरला. यानंतर या व्हिडीओत सूर्या आणि रोहितनेही गाणी गायली. परंतु, तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना या दोन्ही खेळाडूंचा आवाज ऐकल्यानंतर हसू आवरलं नाही. याचदरम्यान उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सर्व खेळाडू गाण्यांचे आवाज ऐकल्यानंतर हसत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रोहितने लिहिलं, तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही…त्यानंतर या व्हिडीओला मुंबई इंडियन्सने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘आग लगा डाला आग’.