Suryakumar Yadav’s 3000 runs in IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये ५४वा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला गेला. वानखेडे स्टेडियवर झालेल्या सामन्यात एमआयने आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट जबरदस्त तळपली. त्याने अवघ्या ३५ चेंडूत ८३ धावा केल्या. या खेळीमुळे त्याने एक विशेष कामगिरी केली आहे. त्याच्या आयपीएलमध्ये ३ हजार धावा पूर्ण झाल्या आहेत.

सूर्यकुमार यादव या विशेष क्लबमध्ये झाला सामील –

सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आपली ६३वी धावा करताच आणखी एक विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात ३०० धावा करणारा तो २२ वा खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो १६वा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, सुरेश रैना, एमएस धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंनी हे यश मिळवले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या लीगमध्ये त्याच्या ७०४४ धावा आहेत.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

१. विराट कोहली- ७०४४ धावा
२. शिखर धवन – ६५९३ धावा
३. डेव्हिड वॉर्नर – ६२११ धावा
४. रोहित शर्मा – ६०७० धावा
५. सुरेश रैना – ५५२८ धावा

सूर्यकुमार यादवची आयपीएल कारकीर्द –

सूर्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध केवळ ३५ चेंडूंत ८२ धावांची खेळी खेळली, ज्यात ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. त्याने या लीगमध्ये १३४ सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने ३०२० धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने १०० षटकार आणि ३२५ चौकार मारले आहेत. याशिवाय त्याच्या नावावर २० अर्धशतके आहेत.

हेही वाचा – IPL 2023: पंजाबविरुद्धच्या विजयानंतर केकेआरला मोठा फटका! बीसीसीआयने ‘या’ कारणासाठी नितीश राणावर केली कारवाई

सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या आणि सामना सहा गडी राखून जिंकला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. दोघांनी शतकी भागीदारीही केली, पण त्यांची खेळी व्यर्थ ठरली. मुंबईसाठी इशान किशनच्या ४२ धावांच्या खेळीनंतर सूर्यकुमार यादवच्या ८३ आणि नेहल वढेराच्या ५२ धावांच्या खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.