Surya Replied to the Trollers: आयपीएल २०२३ च्या ५७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर २१८ धावा केल्या. दरम्यान सूर्यकुमार ४९ चेंडूत १०३ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. या खेळीनंतर सूर्याने त्याची पत्नी देविशाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे.

सूर्यकुमार म्हणाला, “माझ्या कुटुंबाला पाहून मला बरे वाटले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे बसलेली देविशाला पाहून. ती माझी तीन आंतरराष्ट्रीय शतके पाहू शकली नव्हती. त्या सामन्यांना उपस्थित राहण्यासाठी ती स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती. मला खूप आनंद झाला की, आता लोक म्हणू शकणार नाहीत, ती आली होती म्हणून मी शतक झळकावू शकलो नाही.”

Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Giraffe has to face many problems while drinking water shocking video
“आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा…” जिराफाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल यामागचं कारण
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

आनंद दुप्पट झाला –

मुंबई इंडियन्सने त्याच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सूर्याची आई, वडील, पत्नी, बहीण आणि इतर कुटुंबातील सदस्य त्याच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. सूर्याची आई म्हणाली, ‘१०० नंतर आनंद द्विगुणित झाला. सूर्याने पहिल्या सामन्यात ८० च्या वर धावा केल्या होत्या. तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, कारण त्याने आयपीएलमध्ये इतक्या धावा केल्या होत्या.’ सूर्याचे वडील म्हणाले, “अभिमान वाटतो. जेव्हा तो शतक झळकावले, तेव्हा मला तो सामना लाइव्ह पहायचा आहे, असे आम्ही त्याला सांगितले होते. आणि आज आम्ही तो सामना लाइव्ह पाहिला. क्रिकेटचा प्रवास नेहमीच कठीण असतो.’

क्रिकेट हा सूर्याच्या आयुष्याचा एक भाग –

सूर्यकुमारची पत्नी देविशा म्हणाली, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट हा सूर्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे तो क्रिकेटचे वाईट किंवा चांगले घरात आणत नाही. हे सर्व मैदानावर सोडून तो घरी परततो. असे अनेक प्रसंग आले, जेव्हा त्याला चांगले किंवा वाईट दिवस आले पण त्याचा परिणाम तो मैदानाबाहेर जसा आहे, त्या व्यक्तीवर कधीच झाला नाही.’

हेही वाचा – KL Rahul: वॉकरचा आधार घेऊन चालताना दिसला केएल राहुल; शस्त्रक्रियेनंतरचा फोटो व्हायरल

सूर्यकुमारने आयपीएल २०२३ च्या १२ सामन्यांमध्ये १९०.८३ च्या स्ट्राइक रेटने ४७९ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवला गुजरात विरुद्धच्या १०३ धावांच्या शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.