आयपीएल २०२५ ला स्थगितीनंतर पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. प्लेऑफच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान काही विदेशी खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी पुढील काही सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या एका स्टार विदेशी खेळाडूला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे तो वेळेवर भारतात येऊ शकला नाही आणि संघाच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी रविवारी माहिती दिली.

हैदराबाद संघाचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे तो वेळेवर भारतात परतू शकला नाही आणि संघाच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही, असं कोच व्हेटोरी म्हणाले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. यामुळे सर्व विदेशी खेळाडू आपापल्या घरी परतले. ट्रॅव्हिस हेड देखील ऑस्ट्रेलियाला परतला. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स भारतात परतला, पण ट्रॅव्हिस हेड परतला नाही. याबद्दल चर्चा सुरू होती पण आता यामागचे कारण समोर आले नाही. १९ मे रोजी हैदराबाला लखनौबरोबर पुढील सामना खेळायचा आहे.

सनरायझर्सचे प्रशिक्षक व्हेटोरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत खुलासा केला की ऑस्ट्रेलियामध्ये असताना हेडला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. यामुळे तो ताबडतोब भारतात परतू शकला नाही आणि आता सोमवारी सकाळी तो भारतात पोहोचेल, असे व्हेट्टोरी म्हणाले. यामुळे तो लखनौविरुद्ध खेळू शकणार नाही पण तो पुढील सामन्यात खेळेल की नाही हे चौकशीनंतरच ठरवले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेडच्या अनुपस्थितीचा हैदराबादवर फारसा परिणाम होणार नाही कारण संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या ४ वर्षात आयपीएलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी, आयपीएल २०२१ च्या हंगामात कोरोना व्हायरस झाल्याचे आढळले होती. यामुळे स्पर्धा मध्येच थांबवावी लागली आणि काही महिन्यांनी उर्वरित स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती.