Delhi Capitals vs Rajsthan Royals Score Updates : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२३ चा ११ वा सामना रंगतदार होत आहे. गुवाहाटीच्या बरसापारा मैदानात हा सामना खेळवला जात असून दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वालच्या धडाकेबाज खेळीमुळं राजस्थानला २० षटकांत १९९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर २०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाची खराब सुरुवात झाली.

कारण राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे बोल्टच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. संजू सॅमसनने पृथ्वीचा अप्रतिम झेल पकडत दिल्लीच्या सलामीवीर फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संजूने हवेत उडी मारून घेतलेल्या झेलचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

mysterious human like shiny objects floating viral video
एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित
rishikesh River Rafting Raft stuck in rapid during rafting
ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान अपघात; ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO होतोय व्हायरल
How to remove Bad Smell From Dustbin with the help of five rupees
फक्त पाच रुपयांचा बेकिंग सोडा गायब करेन कचरापेटीतील दुर्गंधी, पाहा VIDEO
mystery girl with prithvi shaw
Video: क्रिकेटपटू पृथ्वी शॉबरोबरची ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नक्की वाचा – चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली दुखापत, मुंबईविरोधात होणाऱ्या सामन्याला मुकणार?

राजस्थानने प्रथम फलंदाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. बटलरने ५१ चेंडूत ११ चौकार आणि एक षटकार ठोकत ७९ धावा कुटल्या. यशस्वी जैस्वालनेही ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ चेंडूत ६० धावांची खेळी साकारली. तसंच शिमरन हेटमायरनेही २१ चेंडूत ३९ धावांची नाबाद खेळी केली. हेटमायरने एक चौकार आणि चार षटकार ठोकले. मुकेश कुमारला २ विकेट मिळाल्या. तर कुलदीप यादव आणि पौवेलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.