IPL 2022: थोड्याच वेळात होणार दोन नवीन संघांची घोषणा; ‘ही’ दोन शहरं आघाडीवर

नवीन संघांसाठी अदानी ग्रुपसोबत ‘दिग्गज’ फुटबॉल क्लबच्या मालकांनी लावलीय बोली!

two new ipl franchises to be announced today
आयपीएल २०२२मध्ये असणार दोन नवीन संघ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता लवकरच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दोन नवीन संघांची घोषणा करणार आहे. असे मानले जाते, की लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक फ्रेंचायझीला ७००० कोटी ते १०,००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. २२ कंपन्यांनी १० लाख रुपयांची निविदा कागदपत्रे घेतली आहेत. नवीन संघांची मूळ किंमत २००० कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत अहमदाबाद आणि लखनऊ संघाचे नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. या दोन शहरांमधूनच दोन नवीन आयपीएल संघ असू शकतात, अशी दाट शक्यता आहे. पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२२मध्ये ही स्पर्धा १० संघांची असेल.

फुटबॉलच्या सर्वात प्रसिद्ध क्लबपैकी एक असलेल्या मँचेस्टर युनायटेडनेही आयपीएलची नवीन टीम खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. नवा संघ खरेदी करण्यात क्लबच्या स्वारस्यामुळे बीसीसीआयने टेंडरची तारीख वाढवली होती, अशी चर्चा आहे. त्याच्या व्यतिरिक्त, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक गौतम अदानी आणि त्याचा अदानी समूह अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी बोली लावेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – VIDEO : “तुम्ही रोहितला संघाबाहेर करणार का?”, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना विराटला आलं हसू!

त्याच वेळी संजीव गोयंकाचा आरपीएसजी समूह देखील नवीन फ्रेंचायझीसाठी बोली लावेल अशी अपेक्षा आहे. आयपीएलमधील दोन नवीन संघांसाठी बोली लावण्यात अहमदाबाद आणि लखनऊचा दावा मजबूत दिसत आहे. तथापि, शर्यतीत इंदौर, गुवाहाटी, कटक, धर्मशाला आणि पुणे सारख्या चांगल्या क्रिकेट स्टेडियम असलेल्या शहरांचा समावेश आहे.

एकूण २२ निविदा निवडल्या गेल्या

 • संजीव गोयंका – RPSGचे प्रवर्तक
 • ग्लेझर कुटुंब – मँचेस्टर युनायटेड मालक
 • अदानी समूहाचे प्रवर्तक
 • नवीन जिंदाल – जिंदाल पॉवर अँड स्टील
 • टोरेंट फार्मा
 • रॉनी स्क्रूवाला
 • अरबिंदो फार्मा
 • कोटक ग्रुप
 • CVC भागीदार
 • सिंगापूर आधारित पीई फर्म
 • हिंदुस्तान टाइम्स मीडिया
 • प्रसारण आणि क्रीडा सल्लागार एजन्सी ITW
 • ग्रुप एम
 • कॅप्री ग्लोबल
 • दीपिका-रणवीरला एका आघाडीच्या कॉर्पोरेटने पाठिंबा दिला
 • राजेश आणि अजय गुप्ता – दक्षिण आफ्रिकेचे बिझनेस टायकून

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two new ipl franchises to be announced today adn

Next Story
T20 WC : संघ स्पर्धेबाहेर झाल्यानंतर निराश झाला ‘चॅम्पियन’ क्रिकेटपटू; घेतला धक्कादायक निर्णय!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी