Vaibhav Suryavanshi Second Fastest IPL Hundred History: आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी गुजरात टायटन्सच्या अनुभवी गोलंदाजांवर चांगलाच गरजला आहे. वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूंचा सामना करत या हंगामातील दुसरं सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. या खेळीदरम्यान त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. तो या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. ज्यावेळी त्याची निवड झाली, त्यावेळी त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नव्हता. तो केवळ अंडर १९ क्रिकेट खेळून चर्चेत आला होता. मग राजस्थानने असं काय पाहिलं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता वैभवने आपल्याला १.१ कोटींची बोली लावून संघात का घेतलं आहे, याचं उत्तर दिलं आहे.

गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजय मिळवण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. गुजरातकडे मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि राशिद खानसारखे अनुभवी गोलंदाज होते. या गोलंदाजांचा अनुभव हा वैभव सूर्यवंशीच्या वयापेक्षा जास्त होता. मात्र त्याने कसलाही विचार केला नाही. जागेवर उभा राहून त्याने या अनुभवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरूवात करताना त्याने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या डावात त्याने अवघ्या ३५ चेंडूंचा सामना करत वेगवान शतक झळकावलं. तो या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला आहे.

षटकारांचा पाऊस पाडत रचला इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या डावात फलंदाजी करताना त्याने ७ चौकार आणि ११ षटकार खेचले. या खेळीदरम्यान मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. शतक झळकावण्यापूर्वी त्याने अवघ्या १७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो आयपीएल २०२५ स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. या रेकॉर्डमध्ये त्याने अनुभवी फलंदाज निकोसल पूरनलाही मागे सोडलं.