इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या पर्वाची राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केलीय. राजस्थानाच्या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ६१ धावांची पराभूत करद दमदार विजय मिळवला आहे. या विजयामध्ये संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा महत्वाचा वाटा होता. या विजयानंतर चहलचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ राजस्थानच्या संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये या व्हिडीओमध्ये राजस्थान संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असणारा दिशांत याग्निक हा चहलची मस्करी तरताना दिसतोय.

नक्की वाचा >> IPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

या व्हिडीओमध्ये चहल ड्रेसिंग रुममधून बाहेर पडताना दिसत आहे. तेवढ्यात दिशांत येऊन चहलकडे हात दाखवून एक घोषणा देतो. “१० रुपये की पेप्सी, युजी भाई सेक्सी”, असं दिशांत म्हणतो. मात्र आपल्या खेळाबरोबरच हटके स्टाइल आणि सतत काही ना काही मजेदार गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या चहलने याकडे फारसं लक्ष न देता हसत पुढे निघून जातो. राजस्थानने हा व्हिडीओ पोस्ट करताना, “पुण्याच्या मैदानामधील या घोषणा स्टॅण्डमधून थेट ड्रेसिंग रुमपर्यंत येऊन पोहचल्यात,” अशी कॅप्शन दिलीय.

चहलने या सामन्यामध्ये राजस्थानकडून खेळताना तीन गडी बाद करत नवीन संघासोबत दमदार सुरुवात केली. अवघ्या २२ धावांमध्ये तीन गड्यांना तंबूत पाठवणारा चहल हा राजस्थानसाठी स्टार गोलंदाज ठरला. या कामगिरीमुळे पुन्हा एकदा चहलला टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यासंदर्भातील शक्यता पुन्हा चर्चेत आल्यात.

नक्की वाचा >> IPL 2022: …अन् सामना सुरु असतानाच चहलने पत्नी धनश्रीला दिला Flying Kiss

चहलला बंगळुरुच्या संघाने रिटेन न केल्याने तो यंदा लिलावाच्या माध्यमातून राजस्थानच्या संघामध्ये सहभागी झालाय. पहिल्याच सामन्यात त्याने बंगळुरुच्या संघाला आपण याला सोडून चूक केली की काय असं वाटवं अशी कामगिरी केलीय. त्यामुळे आता मालिकेमध्ये पुढे चहल कसा खेळतो याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. दरम्यान, या पर्वातील आपला पहिलाच सामना राजस्थान रॉयल्सने ६१ धावांनी जिंकला. २११ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकात ७ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.