scorecardresearch

Virat-Anushka: “दो ड्रिंक हो गये तो…”, विराटने आपल्या सवयीबाबत असा काही खुलासा केला की अनुष्काही झाली चकित

विराट कोहली शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो. मात्र, विराट पूर्वी दारू प्यायचा हे फार कमी लोकांना माहिती आहे. याचा खुलासा त्यानेच अनुष्का शर्मासमोर केला आहे.

Virat-Anushka: If there are two drinks in the party Virat reveals his drinking habits Anushka was shocked
सौजन्य- हॉटस्टार (ट्विटर)

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा सध्याच्या सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे. आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जाणारा कोहली युवकांना फिटनेसबाबतही प्रेरित करतो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो खूप मेहनत करतो. मात्र, विराट पूर्वीही दारू प्यायचा हे फार कमी लोकांना माहिती आहे. याचा खुलासा त्यानेच अनुष्का शर्मासमोर केला आहे.

इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड सोहळ्यादरम्यान कोहलीने एक मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अनुष्का शर्माही होती. यावेळी दोघांनी अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली. कोहलीने कबूल केले की त्याने तरुणपणातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आणि तो एक मोठा फूडी होता. त्याने हे देखील उघड केले की तो फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी तो खूप पार्टी करत असे. यादरम्यान तो दारू पिऊन नाचत असे.

असा प्रश्न कोहलीला विचारण्यात आला

रॅपिड-फायर राउंड दरम्यान, कोहली आणि अनुष्काला विचारण्यात आले, “डान्स फ्लोअरवर कोण रॉक करत आहे?” ज्यावर अनुष्काने कोहलीला इशारा केला. विराट आश्चर्यचकित झाला आणि अनुष्काकडे पाहत म्हणाला, “क्या मैं डांस फ्लोर पे धमाल मचाता हूं?” कोहलीने मग जुन्या काळातील एक गोष्ट सांगितली. तो पार्ट्यांमध्ये कशी मजा करत असे.

“मला कोणाचीच पर्वा नव्हती”

कोहली म्हणाला, “मी आता मद्यपान करत नाही, पण आधी पार्टीत गेल्यावर दोन ग्लास मद्य घेत होतो. म्हणजे तेव्हा असे व्हायचे की लोकांची सवय होती मला तिथे कोणीच बघायचे नाही. दोन-तीन ड्रिंक्स नंतर मग मला कोणाचीच पर्वा नसायची. मात्र, आता असे अजिबात राहिलेले नाही. ही तर जुन्या दिवसांची गोष्ट झाली आहे.” विराटचे हे उत्तर ऐकून अनुष्का शर्मा चकित झाली आणि तीही हसली.

‘नाटू-नाटू’वर विराट कोहलीचा डान्स पाहून अनुष्का झाली खूश

अनुष्का आणि विराटने रेड कार्पेटवर यजमानांशी संवाद साधला आणि एक खेळात सहभागी देखील झाली. फन सेगमेंट अंतर्गत अनुष्काला तिच्या कुठल्याही “३AM मित्र” असे नाव देण्यास सांगितले गेले. यावर शर्माने विराटकडे बोट दाखवले आणि दोघेही त्यावर हसले. नंतर विराटला ‘RRR’ मधील सर्वात लोकप्रिय गाणे ‘नाटू – नाटू’ वर डान्स करण्याचे टास्क मिळाले. त्यानंतर विराटने फोनवरून संगीत वाजवले आणि त्यावर जोरदार डान्सही केला. पतीचे डान्स कौशल्य पाहून अनुष्काने टाळ्या वाजवल्या. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

विराटच्या व्हिडिओवर युजर्स जोरदार कमेंट करत आहेत

अनुष्का आणि विराटचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक सोशल मिडीयावरील चाहत्यांनी क्रिकेटरच्या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले, “भयानक डान्सर, क्रिकेटर आला.” दुसर्‍या यूजरने लिहिले की, “खरं सांगायचं तर एसएस राजामौलीसाठी ऑस्करपेक्षाही मोठ गिफ्ट आहे. राजामौली सरांचे अभिनंदन.” एका नेटिझनने लिहिले की, “हे ख्रिस गेलच्या पावलांवर पाऊल होते.”

हेही वाचा: IPL 2023: आयपीएल सुरू होण्याआधीच बीसीसीआयची चिंता वाढली, IPL फ्रँचायझींना दिल्या सक्त सूचना

आरसीबी कॅम्पमध्ये विराट

कोहली सध्या बंगळुरूमध्ये आहे. तो त्याच्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सोबत आगामी हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे. फ्रँचायझीने रविवारी आरसीबी अनबॉक्स इव्हेंटचे आयोजन केले होते. यादरम्यान आरसीबीने आपली नवीन जर्सी लाँच केली. आरसीबीचे दोन माजी दिग्गज ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स या कार्यक्रमाला उपस्थित होते. RCB २ एप्रिलला घरच्या मैदानावर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:01 IST

संबंधित बातम्या