Virat Kohli vs Naveen Ul Haq RCB vs LSG IPL 2023: आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी बंगळुरू आणि लखनऊ सामन्यातील वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाही. तो वाद आणखीनच भडकत चालला आहे. सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली, यानंतर नवीन उल हकनेही सोशल मीडियावरच उत्तर दिल्याचे दिसत आहे. म्हणजे ना विराट कोहली शांत होण्याच्या मूडमध्ये दिसत आहे ना नवीन-उल-हक मागे हटताना दिसत आहे. अशा स्थितीत या वादात आणखीनच भर पडू शकते. त्यात आता यावादाच्या आगीत भडका उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामना खेळापेक्षा वादामुळे चर्चेत आहे. या सामन्यात विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर विराट कोहली गौतम गंभीरशी भिडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवीन-उल-हकने आपला कर्णधार के.एल. राहुलचाही अपमान केला. होय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नवीन-उल-हक आपला कर्णधार लोकेश राहुलचे ऐकण्यास नकार देत आहे. व्हिडिओमध्ये के.एल. राहुल आणि विराट कोहली एकत्र उभे होते आणि नवीन-उल-हक हे सर्व लांबून ऐकत होता. मग त्याला राहुलने बोलावले पण तो आला नाही.

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

हेही वाचा: Kohli vs Naveen-Ul-Haq : विराटचा वार अन् नवीनचा प्रतिवार! लखनऊविरुद्धच्या सामन्यात रंगलेल्या नाट्याचा दुसरा अंक इन्स्टाग्रामवर, पोस्ट व्हायरल

नवीन-उल-हकने तणाव दूर करताना विराट कोहलीची माफी मागावी, अशी के.एल. राहुलची इच्छा होती, असे मानले जाते. मात्र नवीन उल हकने याचा सरळ शब्दात नकार दिला आहे. के.एल. राहुलने नवीनला हाक मारली पण त्याने हस्तांदोलन केले आणि माघार घेतली. नवीनचे हे कृत्य पाहून राहुल आणि विराट दोघेही हैराण झाले. त्यानंतर त्याला इशाराही केला तरी नवीनने याकडे दुर्लक्ष केले.

नवीन उल हकने विराट कोहलीला सोशल मीडियावर केले अनफॉलो

दरम्यान, नवीन-उल-हक याआधी विराट कोहलीला इंस्टाग्रामवर फॉलो करत होता, मात्र आता त्याने कोहलीला अनफॉलो केले आहे, असा अंदाजही सोशल मीडियावर लावला जात आहे. या घटनेनंतर हा सर्व प्रकार घडला आहे. परंतु नवीन उल हकने सोमवारी संध्याकाळपूर्वी नवीन कोहलीला फॉलो केले की नाही हे आम्हाला माहीत नाही. यासोबतच सोशल मीडियावर कोणी कोणाला फॉलो करतो की नाही, हा त्यांच्या वैयक्तिक विषय आहे, मग तो खेळाडू आहे की आणखी कोणी असू देत. विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांचा राग शांत झाल्यावर ते यावर नक्कीच विचार करतील आणि हे प्रकरण इथेच थांबवतील, अशी अपेक्षा करायला हवी.