आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५४ व्या सामन्यात बंगळुरु आणि हैदराबाद या संघांमध्ये लढत होत आहे. दरम्यान, सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली पुन्हा एकदा गोल्डन डकवर बाद झाला. विराटची शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे.

हेही वाचा >>> Delhi Capitals Corona : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला करोनाची लागण, सामन्याला काही तास शिल्लक असताना संघ अडचणीत

बंगळुरु-हैदराबाद या सामन्यात सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरु संघाची सुरुवात फारच खराब झाली. विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस ही जोडी सलामीला आली. मात्र पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. हैदराबाद संघाकडून जगदिशा सुचित पहिले षटक टाकण्यासाठी आला. त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने हलक्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हवेत जात चेंडू थेट केन विल्यम्सनच्या हातात जाऊन विसावला. परिणामी विराट कोहली एकही धाव करु शकला नाही. पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.

हेही वाचा >>> स्टार फलंदाज ख्रिस गेलने सांगितलं IPL 2022 मध्ये न खेळण्याचं कारण; म्हणाला, “मला योग्य सन्मान…”

विराट कोहली २००८ ते २०२१ या आयपीएल हंगामात फक्त तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला होता. मात्र आयपीएलच्या पंधराव्या हंगामात तो तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. त्याने आतापर्यंत फक्त २१६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा >>> ज्या जर्सीवर भारताविरोधात १० विकेट्स घेतल्या तिलाच काढलं विकायला; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा मोठा निर्णय

सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदिशा सुचित, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक</p>

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्लेइंग इलेव्हन

हेही वाचा >>> कॅप्टन विरुद्ध कॅप्टन! श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट हीटमुळे लखनऊला मोठा झटका, केएल राहुल शून्यावर बाद

विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लॉमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड