scorecardresearch

Premium

Video: गौतम गंभीर सचिन तेंडुलकरला भेटला अन् ‘कोहली कोहली’च्या घोषणांनी मैदान दुमदुमला, दिग्गजांची रिअ‍ॅक्शन Viral

गंभीर सचिनसोबत चर्चा करत असताना चाहत्यांनी कोहली कोहेलीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे मैदानात या सामन्यातही नवीन रोमांच पाहायला मिळाला.

Fans Chanting Kohli Kohli Video Viral
गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Twitter)

Fans Chanting Kohli Kohli In Front Of Gautam Gambhir : एलिमिनिटेर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला होता. मुंबईचा विजय झाल्यानंतर लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर मुंबई इंडियन्सचे मेंटॉर सचिन तेंडुलकरला मैदानात भेटला आणि दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. परंतु, याचदरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा गंभीरला डीवचण्याचा प्रयत्न केला. गंभीर सचिनसोबत चर्चा करत असताना चाहत्यांनी कोहली कोहेलीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे मैदानात या सामन्यातही नवीन रोमांच पाहायला मिळाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सचिन आणि गंभीर एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. त्याचवेळी चाहते कोहली कोहलीचा नारा लावत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सचिनला हा आवाज ऐकू आल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिअॅक्शन दिली नाही. तसंच गंभीरनेही चाहत्यांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. आयपीएलच्या या हंगामात कोहली आणि गंभीरच्या वादाने संपूर्ण क्रिडाविश्वात खळबळ उडाली होती. ज्यावेळी हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर झालेल्या लखनऊच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांनी जोर लावून कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

नक्की वाचा – Shubman Gill : शुबमन गिलने सांगितलं त्याच्या जबरदस्त फॉर्ममागचं खरं कारण, म्हणाला, “टी-२० वर्ल्डकपनंतर मी…”

इथे पाहा व्हिडीओ

नवीन उल हक आणि गौतम गंभीर या दोघांनी कोहलीच्या चाहत्यांनी धारेवर धरल्याचे व्हिडीओ समोर आले. या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने लखनऊचा ८१ धावांनी पराभव केला. मुंबईने लखनऊसमोर १८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर लखनऊच्या संघाला फक्त १०१ धावाच करता आल्या. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव करून आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. २८ मे ला चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात फायनलचा महामुकाबला होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 16:30 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×