scorecardresearch

Video : पहिल्याच षटकात मुकेश चौधरीने घेतला पंगा, विराट कोहलीला चेंडू लागताच…

बंगळुरुकडून विराट कोहली आणि कर्णधार फॅफ डू प्लेसिस ही जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली.

VIRAT KOHLI AND MUKESH CHAUDHARI
विराट कोहलीला अशा प्रकारे चेंडू लागला ( iplt20.com)

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील लढच चांगलीच रोमहर्षक ठरली. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजीसाठी येत बंगळुरुने चेन्नईसमोर विजयासाठी १७४ धावांचे आव्हान उभे केले. या सामन्यात गोलंदाजीसाठी आलेल्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात बंगळुरुच्या विराट कोहलीशी पंगा घेतला.

हेही वाचा >>> IPL 2022, RCB vs CSK : मोईन अलीने घातला खोडा, क्लीन बोल्ड झाल्यामुळे विराट कोहलीचं स्वप्न राहिलं अधुरं

चेन्नईने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरुकडून विराट कोहली आणि कर्णधार फॅफ डू प्लेसिस ही जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. सामन्याच्या सुरुवातीलाच चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी गोलंदाजी करण्यासाठी आला. या पहिल्याच षटकात विराट कोहलीला चेंडू लागला. मुकेश चौधरीने पहिल्या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर ही घटना घडली. मुकेशने टाकलेल्या चेंडूला टोलवत विराट चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र चेंडू चौधऱीकडे गेला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता चौधरीने चेंडू स्टंप्सकडे फेकून मारला. त्याने विराटला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात चेंडू स्टंप्सकडे न जाता थेट विराट कोहलीला जाऊन लागला.

हेही वाचा >>> विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी २०० क्लबमध्ये, आयपीएलमध्ये ‘असा’ विक्रम करणारे फक्त दोघे!

चेंडू जारोत फेकल्यामुळे विराट कोहली जखमी होतो की काय अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र महेश चौधरीने कोहलीची लगेच माफी मागितली. त्यानंतर कोहलीनेही चौधरीकडे पाहून स्मीतहास्य केले. दोघांनीही एकमेकांना समजून घेतल्यामुळे वाद निर्माण झाला नाही.

हेही वाचा >>> सरकारने ३३ वर्षांपूर्वी दिलेला प्लॉट सुनिल गावस्कर यांनी केला परत; आव्हाड यांनी व्यक्त केली होती नाराजी, नेमकं काय घडलं?

पुढे विराट कोहलीने ३३ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एक षटकार लगावत ३० धावा केल्या. तर बंगळुरु संघाने वीस षटके संपेपर्यंत १७३ धावा केल्या. बंगळुरु संघाकडून महिपाल लॉमरोर (४२) आणि फॅफ डू प्लेलिस (३८) यांनी उत्तम फलंदाजी केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli hits ball thrown by mukesh chaudhari in rcb vs csk match prd

ताज्या बातम्या