Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ मध्ये सलग दुसऱ्या विजयासह प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धचे २०१ धावांचे लक्ष्य आरसीबीने सहज गाठले आणि विक्रमी विजय मिळवला. पॉवरप्लेमध्ये कर्णधार फाफ डुप्लेसिस बाद झाल्यानंतर विल जॅक्स आणि विराट कोहलीने तुफानी फलंदाजी केली आणि आरसीबीने १६ षटकांत हा सामना जिंकला. पण या सामन्यात विराटने गिलसोबत खूपदा मस्करी केली, त्याला ढकलताना, चिडवतानाही तो दिसला, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

विराटने संपूर्ण सामन्यात शुबमन गिलला दिला त्रास

आरसीबी आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यातील मस्ती पाहा.ला मिळाली. विशेषत: आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान कोहली वारंवार गिलला त्रास देत होता. मैदान सेट करतानाही विराट गिलला सतत चिडवत होता, त्याला गंमतीने चालताना धक्का देत होता. विराट मस्करी करत त्रास देत असला तरी गिलने सामन्यातील आपले लक्ष कायम ठेवले आणि काही वेळा हसत हसत तोही त्याला उत्तर देताना दिसला.

West Indies Brandon King Injured in Super 8 Stage
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजच्या सुपर ८ फेरीत वाढल्या अडचणी, ‘या’ धडाकेबाज खेळाडूला झाली दुखापत
Babar Azam Accused for Fixing in PAK vs USA Match Watch Video
T20 WC 2024: अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने केलं फिक्सिंग? पाकिस्तानमधल्या ज्येष्ठ पत्रकाराचा आरोप; VIDEO व्हायरल
Tanzim Hasan Rohit Paudel Fight Video
BAN vs NEP सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा, लाइव्ह सामन्यात दोन खेळाडू एकमेकांना भिडले, धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल
India Won Against Pakistan by 6 Runs in New York Marathi News
IND vs PAK सामन्यानंतर असं काय झालं? ज्यामुळे दिल्ली पोलिसांनी न्यूयॉर्क पोलिसांकडे केली चौकशी, ट्वीट व्हायरल
Disappointment of Pakistani fan who sold tractor video viral
IND vs PAK सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या चाहत्याने विकला ट्रॅक्टर, भावुक होत सांगितली व्यथा, VIDEO व्हायरल
Azam Khan got out on golden duck in USA vs PAK
USA vs PAK : ‘गोल्डन डक’वर आऊट झाल्यानंतर आझम खान संतापला, चाहत्यांशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Uganda team dance video after victory
T20 WC 2024 : युगांडा संघाने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवल्यानंतर केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल
Hardik Pandya breaks his silence
T20 WC 2024 : घटस्फोटाच्या चर्चांवर आणि कठीण परिस्थितीवर हार्दिक पंड्याने सोडले मौन; म्हणाला, “कधीकधी आयुष्य तुम्हाला…”

विराट कोहलीने केवळ मैदानातच नाही तर डगआऊटमध्ये बसलेला असतानाही गिलला त्रास दिला. गुजरात टायटन्सच्या फलंदाजीदरम्यानही विराटने गिलला चिडवलं. विराट सीमारेषेजवळ आणि तेही गुजरातच्या डगआऊटजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान शुबमन गिल आऊट झाल्यानंतर डगआऊटमध्ये बसला होता तेव्हा विराट तिथेही विराट त्याच्याशी बोलत असताना त्यावा सतत चिडवत होता. विराट आणि गिलची मस्ती भारताच्या सामन्यादरम्यानही पाहायला मिळते. कसोटी सामना सुरू असताना फिल्डींग करताना या दोघांचा फुगडी घालतानाचा व्हीडिओही व्हायरल झाला होता.

विराटच्या ५०० धावा पूर्ण

विराट कोहलीने IPL 2024 मध्ये ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. या हंगामात ५०० धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. विराटने १० सामन्यात ७१ च्या सरासरीने आणि १४७ च्या स्ट्राईक रेटने ५०० धावा केल्या आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूत ७० धावांची नाबाद खेळी केली. त्याने विल जॅकसोबत १६६ धावांची भागीदारी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.