Virat Kohli And Gautam Gambhir Fight Video: आयपीएल २०२३ मधील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याच्या शेवटी काल बाचाबाची पाहायला मिळाली. लखनऊ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर, गोलंदाज नवीन-उल-हक व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली यांच्यात हमरीतुमरी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कोहलीने प्रत्येक विकेटला सेलिब्रेशन करत गंभीरला डिवचल्याने तसेच कृणाल पांड्याचा झेल घेताना ओठांवर बोट ठेवून शांत बसण्याची खूण करण्यावरून हे भांडण झाले अशा चर्चा आहेत. आता या भांडणानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ सुद्धा युट्युबवर चर्चेत आहे. आरसीबीच्या अधिकृत हॅण्डलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू मॅचनंतर हॅन्ड शेक करत होते. यावेळी कोहली आणि गंभीर यांच्यात वाद होताना दिसला. एलएसजीचा गोलंदाज नवीन-उल-हक देखील कोहलीशी वाद घालताना दिसला, ग्लेन मॅक्सवेलने त्याला रोखले. गोंधळाच्या दरम्यान, गंभीर अधिक संतप्त दिसला अखेरीस, दोघांना दोन्ही संघातील खेळाडू, सामना अधिकारी आणि सपोर्ट स्टाफने वेगळे केले. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कोहली व टीम फ्रेश होत असताना कोहलीने प्रतिक्रिया देत म्हंटले की, ” याला बोलतात विजय, जर तुम्ही कोणाला बोलत असाल तर ऐकून घ्यायची पण तयारी ठेवा आणि झेपत नसेल तर बोलू पण नका.”

Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
IPL 2024 Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Instagram Post Goes Viral
IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

दरम्यान, आयपीएल समितीतर्फे सांगण्यात आले की, विराट कोहली व गौतम गंभीरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २. २१ अंतर्गत लेव्हल २ गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्या दोघांना मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, नवीन-उल-हकने, सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.