Virat Kohli Tweet: आयपीएल २०२३ या स्पर्धेला उद्या होणाऱ्या गुजरात आणि चेन्नई सामन्याने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघांतील खेळाडू आपल्या तयारीत आहे. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहलीही तयारी करण्यात व्यस्त आहे. परंतु तरी देखील विराटने वेळात वेळ काढून मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो जितका सुंदर आहे, तितकेच त्याचे कॅप्शनही आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ सुरू होण्याच्या एक दिवस आधी विराट कोहलीने ही पोस्ट शेअर केली आहे. हा फोटो चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यामुळे ते फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.या मोसमात विराट कोहलीचा २०१६ चा दमदार फॉर्म पाहायला मिळेल असे दिसते.

ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

विराट कोहलीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये विराट अनुष्का आणि वामिकासोबत एक छोटा पूल पार करताना दिसत आहे. या फोटोचे कॅप्शन आहे, ‘प्रेमाच्या दिशेने पुल ओलांडणारी प्रत्येक शंका.’ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला दोन एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

विराट कोहली सप्टेंबरपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या आयपीएलमध्ये त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते. आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने २०१६ मध्ये केला होता.

हेही वाचा – IPL 2023: आयपीएल उद्घाटन सोहळ्यात उजळून निघणार आकाश; ड्रोनमधून दिसणार खास शो, पाहा फोटो

आयपीएल २०२३चा आरसीबी संघ:

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेझलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल