Virat Kohli 250 million Instagram Followers: टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मैदानासोबतच सोशल मीडियावरही वर्चस्व गाजवत आहे. विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक पराक्रम केले आहेत. तो एक ना एक मोठा विक्रम आपल्या नावावर करत राहतो. पुन्हा एकदा विराट कोहलीने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे, मात्र यावेळी त्याने मैदानावर नाही तर सोशल मीडियावर हा पराक्रम केला आहे.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि भारताची शान असणारा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर २५० दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती बनला आहे. एवढच नाही तर जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर असा विक्रम करणारा किंग कोहली तिसरा खेळाडू आहे. विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोहलीचे भारतातच नाही तर, जगभरात असंख्य चाहते आहेत.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू

विराट कोहली असा विक्रम करणारा पहिला आशियाई खेळाडू

विराट कोहलीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या २५० मिलियनच्या पुढे गेली आहे. विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २५० दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीचे ट्विटर अकाऊंट आता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाते बनले आहे. त्यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवर आहेत. एकूणच, स्पोर्ट्समध्ये, क्रिस्टियानो रोनाल्डो ५८५ दशलक्ष फॉलोअर्ससह इंस्टाग्रामवर आघाडीवर आहे, तर लिओनेल मेस्सी ४६२ दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. एवढेच नाही तर विराट कोहली १०० मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा पहिला भारतीय देखील आहे.

विराट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून करोडोंची कमाई करतो

हूपरच्या २०२२च्या इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराटला प्रायोजित पोस्टमधून सुमारे ८.६९ कोटी रुपये मिळतात. इंस्टाग्रामवरून कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली १४व्या क्रमांकावर आहे. फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी १५ कोटी रुपये घेतात. विराट कोहलीचे ट्विटर अकाऊंटवर ५० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. २५० दशलक्ष फॉलोअर्ससह, कोहलीने सचिन तेंडुलकर आणि धोनीसारख्या क्रिकेटमधील काही मोठ्या नावांना सहज मागे टाकले आहे. पूर्वीचे इंस्टा वर ४०.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर नंतरचे ४२.२ दशलक्ष फॉलोअर्ससह आघाडीवर आहेत.

हेही वाचा: IPL 2023: “माझ्या मनात खूप काही आहे पण…” किंग कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकची आणखी एक पोस्ट व्हायरल

आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात आरसीबी संघासाठी विराट कोहलीने शानदार कामगिरी केली आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक आठ शतकं ठोकण्याचा विक्रमही स्वत:च्या नावे केला आहे. कोहलीनं सलग दोन सामन्यात शतकं ठोकली तरीही संघाचा पराभव झाला. चालू हंगामातून मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. आतापर्यंत आरसीबी संघाला एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे बंगळुरू संघाचा माजी कर्णधार कोहलीची लोकप्रियता कमी होतेय की काय असे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, विराटच्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. विराट कोहली आता WTC फायनलसाठी लंडनला पोहोचला आहे.