आयपीएल २०२३मधील लीग टप्प्यातील शेवटचा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  यांच्यात खेळला गेला. गुजरातकडून झालेल्या पराभवाने आरसीबीचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले. या पराभवाने चाहत्यांची मने तर मोडलीच पण आरसीबीचा माजी खेळाडू ख्रिस गेललाही खूप दुख झाले त्याचा भावूक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

आरसीबीच्या पराभवानंतर ख्रिस गेल खूप दुःखी आहे, फ्रँचायझीचा माजी खेळाडू ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल २०२३ मधून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर एक रील शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, पार्श्वभूमीत ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ गाणे वाजत असताना गेल, विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडू प्लेऑफमधून बाहेर पडल्याबद्दल शोक करताना दिसत आहे.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

ख्रिस गेल २०११ ते २०१७ या कालावधीत आरसीबीकडून खेळला आहे

खरं तर, गेलला दुखापत का होऊ नये, शेवटी त्याने फ्रँचायझीसोबत बराच काळ घालवला आहे. गेलने आयपीएलमध्ये १४२ सामने खेळले आणि सुमारे ४०च्या सरासरीने आणि सुमारे १५०च्या स्ट्राइक रेटने ४९६५ धावा केल्या. आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा (नाबाद १७५) करण्याचा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे. तो २०११ ते २०१७ पर्यंत आरसीबीकडून खेळला.

शुबमन गिलने कोहलीची मेहनत व्यर्थ ठरवली आयपीएल २०२३च्या शेवटच्या लीग सामन्यात शुबमन गिलच्या शानदार शतकाने कोहलीचे शतक झाकोळले गेले. यासह गुजरात टायटन्सने आरसीबीला सहा गडी राखून पराभूत केले आणि आयपीएलमधून बाहेर काढले. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला संघाला प्ले ऑफमध्ये सामील होण्याची संधी दिली.

या सामन्यात भारताचा माजी कर्णधार कोहलीप्रमाणेच गिलचेही हे सलग दुसरे शतक ठरले. या शतकासह विराट कोहलीने ख्रिस गेलचा विक्रमही मोडला आहे. युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये ६ शतके झळकावली आहेत. पण त्याचा विक्रम गुजरातविरुद्ध खेळताना विराट कोहलीने मोडला. या सामन्यात त्याने ६१ चेंडूत १० धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट १६५.५७ होता.

हेही वाचा: IPL 2023: “जे अपस्टॉक्सला कळाले ते चाहत्यांना…”, मोस्ट व्हॅल्युएबल अ‍ॅसेटचा पुरस्कार मिळवणाऱ्या रवींद्र जडेजाने व्यक्‍त केली खंत

मला वाटतं त्याला निवृत्तीतून बाहेर पडावं लागेल – ख्रिस गेल

यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना विराट कोहलीने शतक झळकावले होते. त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले. त्याचवेळी आरसीबी आणि वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलनेही त्याच्या उत्कृष्ट विक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. तो गमतीने म्हणाला की, “मला वाटतं निवृत्ती परत घ्यावी आणि पुन्हा खेळावे.” JioCinema वर बोलताना ख्रिस गेल म्हणाला की, विराट कोहलीवर कधीही शंका घेऊ नका. शानदार खेळी, उत्तम खेळ, तुम्हाला माहीत आहे की त्याने आपल्या संघाला विजयी स्थितीत आणले. विराट आणि फॅफने चांगली फलंदाजी केली पण हे सगळं विराट कोहलीच्या बाबतीत होतं. विराटने उत्कृष्ट खेळी केली. त्याने युनिव्हर्स बॉसलाही मागे टाकले. मी आता निवृत्तीनंतर परत येत असून पुढच्या वर्षी विराटला भेटेन.