Shubman Gill Out On Ravindra Jadeja Bowling : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील सर्वात महत्वाचा म्हणजेच फायनलचा सामना आज राखीव दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा रंगतदार सामना सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातचा सलामीचा फलंदाज शुबमन गिल मैदानात उतरला. मागील चार सामन्यांत तीन शतक ठोकून इतिहाल रचणाऱ्या शुबमनकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर शुबमनचा दीपक चहरने झेल सोडला आणि त्याला जीवदान मिळाला.

त्यानंतर या संधीचा फायदा घेत शुबमनने आक्रमक फलंदाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. शुबमन चौफेर फटकेबाजी करत असताना चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीनं रणनिती आखली अन् रविंद्र जडेजाला गोलंदाजी दिली. त्यानंतर जडेजाने फेकलेला चेंडू शुबमननने मिस केला आणि धोनीने गिलला ०.१ सेकंदात स्टम्पिंग करून बाद केलं. शुबमनने २० चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. शुबमनचा झंझावात रोखण्यात धोनीला यश आलं. शुबमनला धोनीनं चालाखीनं स्टंम्पिंग केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

नक्की वाचा – सामना पाहण्याच्या उत्सुकतेवर ‘पाणी’ फेरलं! रात्र वैऱ्याची होती, पण धोनीच्या चाहत्यांसाठी नाही, स्टेशनवरचा ‘तो’ Video झाला Viral

इथे पाहा व्हिडीओ

शुबमन गिल यंदाच्या आयपीएल हंगामात कमालीचा फॉर्ममध्ये आहे. या हंगामात शुबमन गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला असून त्याने एकूण ८९० धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे मागील चार सामन्यांत शुबमनने ३ शतक ठोकण्याची चमकदार कामगिरी केली आहे, आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीनंतर एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्यात शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. शुबमनच्या जबरदस्त फलंदाजीबाबत दिग्गज खेळाडूंनी कौतुकाचा वर्षावही केला आहे. आजच्या सामन्यातही तो शतकी खेळी खेळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, धोनीच्या रणनितीनं शुबमनला ३९ धावांवर असताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.