What If SRH vs DC Match Washed out Due to Rain: आयपीएल २०२५ मधील ५५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये खेळवला जात आहे. दिल्लीचा संघ नाणेपेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला आणि दिल्लीच्या फलंदाजांनी यंदाच्या मोसमातील सर्वात खराब फलंदाजी केली. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने भेदक गोलंदाजी करत दिल्लीला १५० धावाही करू दिल्या नाही. दिल्लीच्या संघाने अखेरीस २० षटकांत ६ बाद १३३ धावा केल्या. पण आता हैदराबादमध्ये सुरू असलेल्या सामन्याचा दुसरा डाव सुरू होण्यास विलंब होत आहे. हैदराबादमध्ये पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे.

पॅट कमिन्सने भेदक गोलंदाजी करत आणि हैदराबादच्या गोलंदाजांच्या साथीने पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या ४ फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं. यादरम्यान पॅट कमिन्सने ३ षटकांत ३ विकेट घेतले आहेत. कर्णधार पॅट कमिन्सने या सामन्यात नव्या चेंडूने गोलंदाजीला सुरूवात केली आणि पहिल्याच चेंडूवर नायरला शून्यावर बाद करत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

पॅट कमिन्सने पॉवरप्लेमध्येच ३ षटकांत १२ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. करुण नायरनंतर त्याने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, जो ३ धावा करत बाद झाला. पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कमिन्सने अभिषेक पोरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि तिसरी विकेट मिळवली. यानंतर हर्षल पटेलने अक्षर पटेलला झेलबाद केलं आणि त्यानंतर जयदेव उनाडकटने केएल राहुलला झेलबाद करत सहावी विकेट मिळाली.

दिल्लीने ६ विकेट्स गमावल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने ही धावसंख्या गाठली. स्टब्सने ३६ चेंडूत ४ षटकारांसह ४१ धावांची खेळी करत नाबाद परतला. तर आशुतोष शर्माने २६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह झटपट ४१ धावा केल्या. तर विप्रज निगमने १८ धावांचे योगदान देत संघाला १३३ धावांवर पोहोचवले. यासह दिल्लीने हैदराबादला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान दिले आहे.

पावसामुळे दिल्ली-हैदराबाद सामना रद्द झाल्यास काय होणार?

दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना धक्का बसणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण मिळणार आहे. एका बाजूला दिल्लीसाठी ही थोडी दिलासादायक गोष्ट असेल की संघ १ गुण मिळवण्यात यशस्वी ठरला. तर हैदराबादसाठी हा मोठा धक्का असेल.

दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफच्या आशांवर काय परिणाम होणार?

दिल्ली कॅपिटल्स
गुण – ११ सामन्यात १३ पॉईंट्स
उर्वरित सामने – पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स संघांविरूद्ध
प्लेऑफचं समीकरण – सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला उर्वरित सामन्यांपैकी दोन सामने काही करून जिंकावे लागतील. जेणेकरून संघ १७ गुणांवर पोहोचेल, जे प्लेऑफ पात्रतेसाठी पुरेसे असतील. संघाने तिन्ही सामने जिंकले तर टॉप-२ मध्ये पोहोचेल.

सनरायझर्स हैदराबाद
गुण – ११ सामन्यांमध्ये ७ पॉईंट्स
उर्वरित सामने – कोलकाता नाईट रायडर्सस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ सुपर जायंट्स संघांविरूद्ध
प्लेऑफचं समीकरण- सनरायझर्स हैदराबादने उर्वरित ३ सामने जिंकले तरी संघ १३ गुणांपर्यंत पोहोचेल, जे प्लेऑफसाठी पुरेसे नसतील. त्यामुळे हैदराबादचा संघ जवळपास स्पर्धेबाहेर झाला आहे.