CSK vs KKR IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वाचा पहिला सामना आज मुंबईमध्ये पार पडला. या सामन्यामध्ये गतविजेता चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला गतउपविजेता कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने सहज हरवलं. १३२ धावांचं लक्ष्य कोलकात्याने ९ चेंडू आणि सहा गडी राखून गाठलं. यंदाच्या पर्वापासून चेन्नईच्या संघामध्ये मोठे बदल झाल्याचं दिसत आहे. पहिल्यांदाच चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाशिवाय खेळला. गुरुवारी धोनीने कर्णधार पदाची जबाबदारी रविंद्र जडेजाकडे सुपूर्द केली. या बदलचा मोठा परिणाम आजच्या सामन्यामध्ये जाणवला. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विजय मिळवण्यात जडेजाला अपयश आलं. मात्र याच जोडीने आणखी एक मोठी कमतरता चेन्नईच्या संघात जाणवली ती म्हणजे सुरेश रैनाची.

नक्की वाचा >> CSK vs KKR : नवं पर्व… नवा डान्स! ब्राव्होच्या या नव्या सेलिब्रेशनचा नेमका अर्थ काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका क्षणी ६१ ला पाच गडी बाद अशी स्थिती असताना चेन्नईला रैनासारख्या विश्वासू खेळाडू कमतरता प्राकर्षाने जावणत होती. मात्र २००८ नंतर पहिल्यांदाच रैना चेन्नईच्या संघाकडून खेळत नाहीत. या वेळेस लिलावात रैनाला चेन्नईच्या संघाबरोबरच इतर कोणत्याही संघाने विकत घेतलेलं नाही. खासगी कारणासाठी रैनाने २०२० मध्ये दुबईतील पर्वामधून माघार घेत परण्याचा निर्णय घेतल्याचं वगळता रैना आयपीएलच्या जवळजवळ सर्वच पर्वांमध्ये चेन्नई सोबत होता. चेन्नईचा हा माजी डावखुरा फलंदाज हा आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. चार वेळा चेन्नईला जेतेपद जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. २०१० मध्ये चेन्नईने मुंबईला पराभूत करुन चषकावर पहिल्यांदा नाव कोरलेले तेव्हा अंतिम सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार रैनालाच मिळाल होता.

चेन्नईच्या संघामध्ये रैनाला स्थान न देण्यात आल्याने चेन्नईच्याच अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अर्थात आज रैना चेन्नईच्या संघात दिसला नसला तरी तो कॉमेन्ट्री बॉक्समध्ये उपस्थित होता. स्टार स्पोर्ट्सवरील सामन्याआधीच्या कार्यक्रम आणि चर्चासत्रामध्ये रैना सहभागी झाला होता. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना रैना स्वत: चेन्नईच्या संघाच्या आठवणीमध्ये भावूक झाल्याचं दिसला. त्याने हसता हसता पुन्हा एकदा चेन्नईसाठी खेळण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. “मी मैदानाजवळून या शोसाठी येत असताना मला असं वाटलं की मी लगेच पिवळी जर्सी घालून मैदानात प्रवेश करावा,” असं रैना म्हणाला. रैनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला हजारोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत. हसत सांगितलेल्या गोष्टीमध्ये सांगणाऱ्याला दु:ख वाटत नाही असं नसतं अशा अर्थाने हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

या कार्यक्रमादरम्यान तसेच समालोचनादरम्यान रैना अनेकदा धोनीचा उल्लेख धोनी भाई, माही भाई असा करताना दिसून आलं. अनेकांनी रैनाला या नवीन जबाबदारीसाठी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्यात.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wish i could wear yellow and go into stadium suresh raina gets emotional on ipl commentary debut watch scsg
First published on: 26-03-2022 at 23:42 IST