भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) पुढील वर्षीपासून महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटला प्रारंभ करण्याची योजना आहे, असे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी सांगितले. याचप्रमाणे एक वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा महिलांचे चार प्रदर्शनीय सामने होणार आहेत.

महिलांचे ‘आयपीएल’ सुरू करण्यात दिरंगाई केल्यामुळे टीका होत असलेल्या ‘बीसीसीआय’ला आता वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर गांगुली यांनी दिली.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान

‘‘पुरुषांच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने चालू असताना तीन महिला संघांमध्ये चार प्रदर्शनीय सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या हंगामात पाच ते सहा संघांचा समावेश असू शकेल, परंतु यासाठीसुद्धा सर्वसाधारण सभेची मंजुरी लागेल,’’ असे ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. प्रदर्शनीय सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होण्याची दाट शक्यता आहे.

प्रसारण हक्काची निविदा लवकरच

२०२३ ते २०२७ या कालावधीसाठी ‘आयपीएल’च्या प्रसारण हक्काची निविदा लवकरच जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय समितीच्या सभेत चर्चा झाली. २०१८ ते २०२२ या चार वर्षांसाठी स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपये रकमेला हे हक्क प्राप्त केले होते. परंतु लीगची लोकप्रियता आणि दोन वाढीव संघांमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे प्रसारण हक्क ४० हजार कोटी रुपये रकमेपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.