IPL 2022: …अन् सामना सुरु असतानाच चहलने पत्नी धनश्रीला दिला Flying Kiss

चहलने राजस्थान विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात तीन गडी बाद करत नवीन संघासोबत दमदार सुरुवात केली.

IPL 2022: …अन् सामना सुरु असतानाच चहलने पत्नी धनश्रीला दिला Flying Kiss
या फोटोंना जवळजवळ तीन लाख ७० हजारांच्या आसपास लाइक्स आहेत (फोटो राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)

जर्सीचा रंग बदलला असला तरी यजुवेंद्र चहलची शैली बदलेली नाही असेच राजस्थान विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांमधील मंगळवारचा सामना पहिल्यानंतर पुन्हा एकदा दिसून आलं. चहलने या सामन्यामध्ये राजस्थानकडून खेळताना तीन गडी बाद करत नवीन संघासोबत दमदार सुरुवात केली. अवघ्या २२ धावांमध्ये तीन गड्यांना तंबूत पाठवणारा चहल हा राजस्थानसाठी स्टार गोलंदाज ठरला. अर्थात या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने उभा केलेला २१० धावांचा डोंगर पाहता चहलच्या गोलंदाजीमुळे अगदी सामना फिरला असं म्हणता येत नसलं तरी या कामगिरीमुळे पुन्हा एकदा चहलला टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यासंदर्भातील शक्यता पुन्हा चर्चेत आल्यात.

नक्की वाचा >> IPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…

आपल्या खेळाबरोबरच हटके स्टाइल आणि सतत काही ना काही मजेदार गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या चहलने या सामन्यामध्येही अशी एक गोष्ट केली ती त्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागलीय. झालं असं ती चहलची पत्नी धनश्री ही त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी चहलने पत्नीला मैदानामधूनच फ्लाइंग कीस दिला. या अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शनचे फोटो राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलेत.

चहलला बंगळुरुच्या संघाने रिटेन न केल्याने तो यंदा लिलावाच्या माध्यमातून राजस्थानच्या संघामध्ये सहभागी झालाय. पहिल्याच सामन्यात त्याने बंगळुरुच्या संघाला आपण याला सोडून चूक केली की काय असं वाटवं अशी कामगिरी केलीय. त्यामुळे आता मालिकेमध्ये पुढे चहल कसा खेळतो याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. पण कालच्या सामन्यामध्ये त्याच्या कामगिरीबरोबरच या फ्लाइंग किसनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे मात्र नक्की. या फोटोंना जवळजवळ तीन लाख ७० हजारांच्या आसपास लाइक्स आहेत.

हा सामना राजस्थान रॉयल्सने ६१ धावांनी जिंकला. २११ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकात ७ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yuzvendra chahal give flying kiss to dhanashree verma moment goes viral after rajasthan beat hyderabad see pics scsg

Next Story
IPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी