Yuzvendra Chahal Shares Yashasvi Jaiswal Photo: राजस्थान रॉयल्स संघाकडून यंदाच्या मोसमात युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालची बॅट जबरदस्त तळपताना दिसली आहे. आता राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर यशस्वी जैस्वालचा अॅनिमेटेड महिला अवतारातील फोटो पोस्ट केला आहे.

युजवेंद्र चहलने यापूर्वी भारतीय संघातील त्याचा सहकारी कुलदीप यादवचा असाच फोटो पोस्ट केला होता. जैस्वालचा हा फोटो पोस्ट करण्यासोबतच चहलने त्याला टॅगही केले आहे. जेणेकरून चाहत्यांना समजणे सोपे जाईल. दरम्यान यंदा युजवेंद्र चहलने देखील या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. त्याने या हंगामात एका मोठ्या विक्रमलाही गवसनी घातली. तो आता आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
युजवेंद्र चहल इन्स्टाग्राम स्टोरी

चहल आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. चहलच्या नावावर आता आयपीएलमधील १४४ सामन्यांत १८७ विकेट्स आहेत. त्याने ड्वेन ब्राव्होचा १८३ बळींचा विक्रम मागे टाकला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चहलने हे स्थान गाठले. आयपीएलच्या १६व्या हंगामात युजवेंद्र चहलने आतापर्यंत १३ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2023: मुनव्वर फारुकीला प्री मॅच शोमध्ये बोलावल्याने संतापले चाहते, स्टार स्पोर्ट्सवर बहिष्कार घालण्याची केली मागणी

यशस्वी जैस्वालसाठी हा सर्वोत्तम मोसम ठरला –

२१ वर्षीय डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालसाठी आतापर्यंतचा हा आयपीएल मोसम खूप चांगला राहिला आहे. जैस्वालने आतापर्यंत १३ डावात ४७.९२ च्या सरासरीने ५७५ धावा केल्या आहेत. जैस्वालच्या बॅटमधून आतापर्यंत एक शतक आणि ४ अर्धशतक आली आहेत. राजस्थान रॉयल्सने पहिल्या ५ पैकी ४ सामने जिंकत या मोसमाची चांगली सुरुवात केली. यानंतर संघाच्या कामगिरीत घसरण झाली आणि आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यताही कमी झाली आहे. राजस्थानचे सध्या १३ सामन्यांत १२ गुण आहेत आणि शेवटचा सामना जिंकण्यासह इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.