आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३० वा सामना चांगलाच अटीतटीचा ठरला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. राजस्थानने दिलेले २१७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी केकेआरने शेवटपर्यंत संघर्ष केला. मात्र राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने हॅटट्रिक करत केकेआरकडून विजय खेचून आणला. राजस्थानचा ७ धावांनी विजय झाला. युजवेंद्र चहलने या सामन्यात एकूण पाच बळी घेतले. त्याची ही कमाल पाहून युजवेंद्रचही पत्नी धनश्री वर्माला चांगलाच आनंद झाला. पतीची हॅटट्रिक होताच पत्नी धनश्री वर्मा बेभान होत उड्या मारताना दिसली. तिच्या या खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

हेही वाचा >>> PBKS VS DC : करोनामुळे दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले, आता मुंबईत लढत रंगणार

युजवेंद्रच्या हॅटट्रिकमुळे राजस्थानचा विजय

राजस्थानने दिलेल्या २१८ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर तुफानी फलंदाजी करत होता. कोलकाताने सतराव्या षटकापर्यंत १८० धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यर अजूनही मैदानावर फलंदाजी करत असल्यामुळे केकेआरचा विजय होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र सतराव्या षटकात फिरकीपटू युजवेंद्र चहलने कमाल केली. त्याने श्रेयस अय्यरला पायचित केलं. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ शिवम मावी आणि पॅट कमिन्स या जोडीला तंबुत पाठवलं. तीन चेंडूवर तीन बळी घेत चहलने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिली हॅटट्रिक स्वत:च्या नावावर नोंदवली. युजवेंद्रने घेतलेल्या याच तीन बळींमुळे राजस्थानला विजय मिळवता आला.

हेही वाचा >>> Yuzvendra Chahal’s Hat-Trick : हॅटट्रीकनंतर युझवेंद्र चहलने मैदानावर दिली ‘ती’ खास पोझ; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री वर्माचे सैराट सेलिब्रेशन

युजवेंद्रची ही कमाल पाहून मैदानातील सर्वच प्रेक्षक भारावून गेले होते. प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत असलेली युजवेंद्रची पत्नी धनश्रीचा आनंददेखील लपून राहिला नाही. युजवेंद्रने हॅटट्रिक करताच धनश्री जागेवर उठून जोरात उड्या मारत होती. विशेष म्हणजे तीन आनंदाने ओरडताना दिसत होती. तिचे हे सैराट सेलब्रिशेन नंतर चर्चेचा विषय ठरले.

हेही वाचा >>> IPL 2022, RR vs KKR : हलक्यात घेणं पडलं महागात! हेटमायरच्या डायरेक्ट हीटमुळे पहिल्याच चेंडूवर नरेन धावबाद

युजवेंद्रच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे राजस्थानचा सात धावांनी विजय झाला. केकेआरला २१० धावा करता आल्या. युजवेंद्रने हॅटट्रिकसह पूर्ण सामन्यात पाच विकेट्स घेतल्या.