आयपीएलचे पंधरावे पर्व चांगलेच रोमहर्षक ठरले. या हंगामात अनेक नवख्या खेळाडूंनी दिमाखदार खेळ केला. तर जोस बटलर, डेव्हिड वॉर्नरसारख्या विदेशी खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जोस बटलरने तर आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त धावा केल्या असून सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. मात्र राजस्थान रॉयल्स संघाच्या एका खेळाडूने मला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली असती तर मी बटलरपेक्षा जास्त धावा करुन दाखवल्या असता असा विश्वास व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> IPL 2022 Final GT vs RR Playing 11 : गुजरात आणि राजस्थानदरम्यान रंगणार अंतिम लढत, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य संघ

हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा आहे. मला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली असती तर मी ८०० नव्हे तर १६०० धावा केल्या असत्या असे युझवेंद्र चहलने मिश्किलपणे म्हटले आहे. हा मजेशीर व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

हेही वाचा >> IPL 2022 Final GT vs RR : मोदी लावणार आयपीएल फायननला हजेरी? चर्चांना उधाण, अहमदाबादेत ६००० पोलीस तैनात

या व्हिडीओमध्ये राजस्थान रॉयल्सचे खेळाडू बसलेले दिसत आहेत. संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक लसिथ मलिंगादेखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये जोस बटलरने ८०० धावा केल्या. मी जर सलामीला फलंदाजीसाठी गेलो असतो तर १६०० धावा केल्या असत्या, असे युझवेंद्र म्हणत आहे. हे वक्तव्य युझवेंद्रने मिश्किल सुरात म्हटलेले असल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> IPL 2022 Final: अंतिम सामन्यासाठी गृहमंत्री अमित शाह लावणार हजेरी, सुरक्षेसाठी तब्बल सहा हजार पोलीस तैनात

दरम्यान, आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये आयपीएल २०२२ पर्वातील अंतिम लढत होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री ८.३० वाजता या सामन्याला सुरवात होणार असून बॉलिवुड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असणार आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal said will do more runs as of jos buttler in ipl 2022 video went viral prd
First published on: 29-05-2022 at 14:53 IST