Interesting Facts In IPL History : जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२० पहिला सामना ३१ मार्चला रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने येणार आहेत. पण याआधी आयपीएल इतिहासावर एक नजर टाकली, तर अनेक विक्रमांना गवसणी घालण्यात आली असल्याचं पाहायला मिळेल. आयपीएलमध्ये पहिला विकेट कोणत्या गोलंदाजांने घेतला? कोणत्या फलंदाज पहिल्यांदा बाद झाला? आयपीएलचा पहिला सामना कोणत्या दिवशी झाला? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेले असतात. आज आम्ही तुम्हाला हाच इतिहास उलगडून सविस्तर माहिती सांगणार आहोत.

आयपीएलमध्ये कुणी घेतला पहिला विकेट?

आयपीएलमध्ये पहिला विकेट घेण्याचा विक्रम टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानच्या नावावर आहे. जहीरने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. या सामन्यात जहीरने चार षटकांची गोलंदाजी केली होती. याचदरम्यान जहीरने ३८ धावा देत एक विकेट घेतलं होतं.

Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Punjab Kings vs Mumbai Indians match updates in marathi
PBKS vs MI : रोहित शर्मा रचणार इतिहास, एमएस धोनीनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार दुसरा खेळाडू
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत रचला इतिहास, आयपीएलच्या १७ वर्षांत ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

नक्की वाचा – IPL: डेथ ओव्हर्समध्ये ‘या’ फलंदाजांनी पाडलाय चौकार-षटकारांचा पाऊस, एम एस धोनी कितव्या स्थानावर?

आयपीएलमध्ये सर्वात पहिल्यांदा कोणता फलंदाज बाद झाला?

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आयपीएलमध्ये सर्वात पहिल्यांद बाद झाला होता. जहीर खानने गांगुलीला आयपीएलच्या पहिल्या सीजनच्या पहिल्या सामन्यात बाद केलं होतं. या सामन्यात जॅक कॅलिसने गांगुलीला १० धावांवर असताना बाद केलं होतं.

आयपीएलचा पहिला सामना कधी आणि कोणत्या संघांविरुद्ध खेळवण्यात आला?

आयपीएलच्या पहिल्या पर्वाचा शुभारंभ २००८ मध्ये झाला होता. आयपीएलचा पहिला सामना १८ एप्रिल २००८ मध्ये बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या पहिल्या सामन्यात सौरव गांगुलीची कोलकाता नाईट रायडर्स टीम तर राहुल द्रविडची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम आमने-सामने होती. त्यावेळी केकेआरने १४० धावांच्या फरकाने या सामन्यात मोठा विजय मिळवला होता.