Cricket Match Funny Video Viral : क्रिकेटच्या मैदानात कधी कधी अशा घटना घडतात, ज्यांना पाहून चाहते लोटपोट हसल्याशिवाय राहत नाहीत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या एका कसोटी सामन्यात असंच काहीसं घडलं आहे. आर्यलॅंडच्या कर्णधाराने एका क्षुल्लक कारणासाठी डीआरएस घेतला, कारण त्यांच्या संघातील विकेटकिपरला टॉयलेटला जायचं होतं. जेव्हा जो रुट फलंदाजी करण्यासाठी आला आणि २ धावांवर खेळत असताना इंग्लंडचा डाव ६४ व्या षटकापर्यंत पोहोचला होता.
याच षटकात गोलंदाज ग्राहम ह्यूमच्या चेंडूवर रुटने रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पॅडवर लागला. अशातच आर्यलॅंडचा कर्णधार आणि खेळाडू पायचित झाल्याची अपिल करु लागले. पण अंपायरने फलंदाजाला बाद न देण्याचा निर्णय दिला. चेंडू स्टंपला लागणार नाही आणि खेळपट्टीच्या लाईनच्या बाहेर जाईल, हे माहित असताना सुद्धा कर्णधाराने डीआरएस घेतला.




इथे पाहा व्हिडीओ
आर्यलॅंडच्या कर्णधाराने डीआरएस घेतल्यानंतर विकेटकीपर लोकर्न टकर पॅव्हेलियनच्या दिशेनं धावला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तर डीआरएसचा निर्णय इंग्लंडच्या बाजूनं राहिला. जेव्हा थर्ड अंपायरने जो रुटला नॉट आऊट दिलं आणि खेळ सुरु होणार होता, पण तोपर्यंत विकेटकीपर मैदानात पोहोचला नाही. ज्यामुळं खेळ उशिराने सुरु झाला. थोड्या वेळानंतर विकेटकीपर धावत धावत मैदानात आला आणि मैदानात एकच हशा पिकला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.