IRE W vs ENG W T20I Highlights: इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ आयर्लंडचा दौऱ्यावर होता. यामध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि २ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली गेली. इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, तर टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना डब्लिन येथे १५ सप्टेंबरला खेळला गेला. या सामन्यात आयर्लंडच्या महिला संघाने इतिहास घडवला आहे. आयर्लंडने प्रथमच टी-२० सामन्यात इंग्लंडला हरवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

आयर्लंडच्या महिला संघाने घडवला इतिहास

आयर्लंडच्या महिला संघाने याआधी कधीही टी-२० फॉरमॅटमध्ये इंग्लंडला हरवले नव्हते. पण कर्णधार गॅबी लुईसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडने इतिहास घडवला आणि पहिला टी-२० विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंडच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही आयरिश संघाने चमकदार कामगिरी केली आणि १ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Dodda Ganesh has been sacked as the coach of the Kenya men's national team
माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India win Over Bangladesh in Kanpur Test IND vs BAN
IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
KL Rahul to Join RCB In IPL 2025 Gives Hint Saying Lets Hope so In Viral Video
KL Rahul: केएल राहुल RCB मध्ये परतणार? स्वतःच दिले मोठे संकेत; VIDEO तुफान व्हायरल
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin 6th century
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ८ गडी गमावून १६९ धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर म्हणून ब्रायोनी स्मिथने २६ चेंडूत २८ धावा केल्या, तर टॅमी ब्युमॉन्टने ३४ चेंडूत ४० धावा केल्या. याशिवाय सेरेन स्मॉल १० चेंडूत १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तर पेज स्कॉलफिल्डने २१ चेंडूत ३४ धावा केल्या. इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात संघातील सर्व खेळाडूंनी योगदान दिले.

हेही वाचा – माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीवीर एमी हंटर ३ चेंडूत १ धाव करत पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र, यानंतर गॅबी लुईस आणि ओरला प्रेंडरगास्टने डावाची धुरा सांभाळली. लुईसने ३५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली, तर प्रेंडरगास्टने ५१ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. आयर्लंडने १९.५ षटकांत ५ बाद १७० धावांचे लक्ष्य गाठून ऐतिहासिक विजय मिळवला.

हेही वाचा – Neeraj Chopra: डायमंड लीगचं जेतेपद कशामुळे हुकलं? नीरज चोप्राने सांगितलेलं कारण ऐकून चाहते म्हणाले, आमच्यासाठी तूच चॅम्पियन

रोमांचक सामन्यात आयर्लंडने असा मिळवला विजय

शेवटच्या ७ चेंडूत आयर्लंडला ७ धावांची गरज होती आणि १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रेंडरगास्ट बाद झाली. प्रेंडरगास्ट बाद झाल्यानंतर मॅडी विलियर्सने सलग २ विकेट घेत सामना रोमांचक वळणावर आणला. पण क्रिस्टीना कुल्टरने पाचव्या चेंडूवर दोन धावा करत आयर्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. प्रेंडरगास्टला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.