scorecardresearch

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इरफान पठाणचा कोहलीला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, विराटने ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवावी

Border Gavaskar Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेली ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी इरफान पठाणने विराट कोहलीला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

Border Gavaskar Series IND vs AUS
विराट कोहली (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे मला पाहायला आवडेल, असे भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लान’ कार्यक्रमात इरफान म्हणाला, ‘नॅथन लायन आणि अॅश्टन आगर यांच्या फिरकीला कसे उत्तर द्यायचे हे कोहली नक्कीच लक्षात ठेवेल. गेल्या काही काळात तो फिरकीविरुद्ध संघर्ष करत आहे. मला वाटते की तो थोडा अधिक आक्रमक होऊ शकतो. कारण फिरकीविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेटही खाली आला आहे.

तो म्हणाला, “मला माहित आहे की आपण कसोटी क्रिकेटबद्दल बोलत आहोत, परंतु कधीकधी तुम्हाला फिरकीविरुद्ध थोडे अधिक आक्रमक होण्याची गरज असते. विशेषत: जेव्हा तुम्ही लायनसारख्या गोलंदाजांचा सामना करत असाल, तेव्हा या स्पर्धेत तुमची चांगली कामगिरी होईल. त्याचे फिरकीवर उत्तम नियंत्रण आहे, त्याला भरपूर उसळी मिळते आणि तो चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजापासून दूर नेतो. त्यामुळे ही एक गोष्ट कोहलीने लक्षात ठेवायला हवी.”

भारत सध्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये क्रमांक एकचा संघ आहे. रोहित शर्माच्या टीमने ९ नोव्हेंबरपासून सुरू होणारी चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकल्यास खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये देखील अव्वल स्थानावर जातील. ही मालिका जिंकून भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचू शकतो, जिथे त्याचा सामना ऑस्ट्रेलियाशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: जेफ थॉमसनने विराटला बाद करण्याची सांगितली युक्ती; म्हणाला, “त्याला फक्त…”

इरफान पठाण म्हणाला, की बॉर्डर-गावसकर करंडक पदार्पण करणार्‍यांसाठी खास असणार आहे. कारण ते जागतिक क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघाविरुद्ध कसोटी पदार्पण करण्यासाठी उत्सुक असतील.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: दिनेश कार्तिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

पठाण म्हणाला, ”मला वाटते दडपण नक्कीच आहे, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे, जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक संघाविरुद्ध खेळणे खूप रोमांचक आहे. मी जेव्हा माझा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळलो, तेव्हा तो चॅम्पियन संघ होता. पण २१ वर्षांनंतर आम्ही तो कसोटी सामना जिंकला हे मी विसरू शकत नाही. तर हा असाच इतिहास आहे, जो तुम्ही बनवता आणि तो कायम तुमच्यासोबत राहतो. त्यामुळे मला वाटते की ते खेळाडू देखील असेच करू पाहत असतील, जे त्यांच्यासमोरील आव्हानाबद्दल खूप उत्सुक असतील.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 09:18 IST