Irfan Pathan share Cricket Cameraman Video : क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो दिवसेंदिवस आधुनिक होत चालला आहे. एक काळ असा होता की लोक फक्त रेडिओवर क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री ऐकायचे. मग हळूहळू क्रिकेट सामने टीव्हीवर दिसू लागले. सुरुवातीच्या काळात टीव्हीवर क्रिकेट पाहणे हा काही चांगला अनुभव नव्हता. पण हळूहळू तंत्रज्ञान बदलले आणि आता टीव्ही किंवा मोबाईलवर क्रिकेट पाहण्यासाठी अनेक अँगल आहेत. तुम्ही अनेकदा टीव्हीवर चाहत्यांवर कॅमेरे झूम करताना पाहिले असतील. याबाबतचा एक व्हिडीओ इरफान पठाणने शेअर केला आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी दाखवले आहे की कॅमेरामॅन एखाद्या गोष्टीवर झूम कसे करतात. या व्हिडीओत तो कॅमेरामनशी बोलतानाचा आवाज येत आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटूने लाइव्ह सामन्यात कॅमेरामॅन एखाद्या गोष्टीवर झूम कसे करतात? याचा डेमो दिला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इरफान पठाण कॅमेरामनकडे जातो आणि मला कॅमेराच्या मदतीने वर बसलेले तीन फॅन्स दाखवा असे म्हणतो.

reshma shinde kelvan arrange by pratiksha mungekar and ashutosh patki
मालिकेत तुफान भांडणं पण, पडद्यामागे…; रेश्मा शिंदेच्या केळवणासाठी ऑनस्क्रीन जाऊबाईंनी केलेली ‘अशी’ तयारी, पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
remo dsouza attend mahakumbh mela
Video : जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर चेहरा लपवून महाकुंभमेळ्याला पोहोचला अन्…; बॉलीवूड कोरिओग्राफरचा व्हिडीओ व्हायरल
Marathi Actor Meets Riteish Deshmukh
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
viral video of vardha
VIDEO : आधी कानाखाली मारली अन् खाली पाडून…; राज्यात दिवसाढवळ्या तरुणीला मारहाण, कारण काय?

कॅमेरामॅन चाहत्यांवर कसं झूम करतात?

त्यानंतर कॅमेरामन वर बसलेल्या चाहत्यांना झूम इन करतो. झूम होताच स्टेडियमच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसलेले चाहते स्पष्टपणे दिसू लागतात. चाहते इतके दूर बसले होते की ते डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नव्हते, परंतु कॅमेराने ते सहज शक्य केले. कॅमेरामन प्रथम ‘झूम इन’ करतो, ज्यामुळे चाहत्यांना दिसतात आणि नंतर कॅमेरामन ‘झूम आउट’ करतो, ज्यामुळे चाहते दिसायचे बंद होतात.

हेही वाचा – BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल

त्यानंतर व्हिडिओमध्ये कॅमेरामन पुढे म्हणाला, ” बरं झालं, समोर कोणाचं घर नाही.” या व्हिडिओला कॅप्शन देत पठाणने लिहिले की, “हा तोच कॅमेरामन आहे जो चाहत्यांना झूम करत राहतो. झूम बघा किती आश्चर्यकारक आहे.”

Story img Loader