scorecardresearch

Spot Fixing Allegations: मोहम्मद शमीने खरच मॅच फिक्सिंग केली होती? इशांत शर्माने असे उत्तर दिले की हसीन जहाँसह सर्वांचीच तोंडं बंद

मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. अँटी करप्शन युनिटसोबतच्या संभाषणात इशांत शर्मा जे काही बोलला त्यावरून त्याने शमीचे मन जिंकले.

How Hasin Jahan made Mohammed Shami's life hell Ishant Sharma narrated the story about match fixing allegations on Shami
सौजन्य- (ट्विटर)

Spot Fixing Allegations Mohammed Shami: मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. मोहम्मद शमीने केवळ भारतातच नव्हे तर परदेशी खेळपट्ट्यांवरही चमकदार गोलंदाजी करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. टीम इंडियासाठी ६१ कसोटी सामने खेळणाऱ्या मोहम्मद शमीसाठी महान गोलंदाज बनण्याचा मार्ग सोपा नव्हता. २०१८ मध्ये मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप होते आणि त्याच्यावर अनेक गंभीर आरोप होते. हसीन जहाँने सांगितले की, “पाकिस्तानी मुलगी शमीला पैसे पाठवत असे.”

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या सीम पोझिशनमुळे सध्याच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणला जातो. शमीने गेल्या १० वर्षांत भारतासाठी अनेक सामने जिंकणारी कामगिरी केली आहे, परंतु त्याची कारकीर्दही चढ-उतारांनी भरलेली आहे. दिनेश कार्तिकने नुकतेच सांगितले होते की, “शमीला नेटमध्ये सामोरे जाणे खूप कठीण आहे आणि हे केवळ त्याचे मत नाही तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही नेटमध्ये शमीचा सामना करणे आवडत नाही. शमीच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्पा २०१८ मध्ये होता. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांसह अनेक गंभीर आरोप केले होते. शमीसाठी तो वेळ कसा गेला याबद्दल त्याचा सहकारी गोलंदाज इशांत शर्माने सांगितले आहे.

शमी आयुष्यात कधीच मॅच फिक्सिंग करू शकत नाही

क्रिकबझच्या ‘राईज ऑफ न्यू इंडिया’ शोमध्ये इशांत शर्मा म्हणाला, “मी त्याच्याशी थोडं बोललो आणि तो माझ्याशी याबद्दल खूप बोलला. घडलेल्या प्रकारानंतर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आम्हा सर्वांशी संपर्क साधला. आणि ते आम्हाला विचारत होते की शमी मॅच फिक्सिंग करू शकतो का, जसे की पोलिस तक्रार दाखल करा… ते मला सर्व काही विचारत होते आणि कागदावर सर्वकाही लिहीत होते. तेव्हा मी त्याला सांगितले की मला त्याच्या वैयक्तिक समस्यांबद्दल माहिती नाही, परंतु मला २०० टक्के खात्री आहे की तो मॅच फिक्सिंग करू शकत नाही. तो करू शकत नाही कारण मी त्याला चांगले ओळखतो. जेव्हा त्याला हे समजले तेव्हा मला त्याच्याबद्दल काय वाटते ते त्याला समजले आणि आमचे नाते चांगले झाले.”

इशांत शर्मा पुढे म्हणाला, “मी त्याला इतके चांगले ओळखतो की तो असे कधीच करणार नाही. जेव्हा शमीला समजले की मी हे बोललो तेव्हा त्याला कळले की मी त्याच्याबद्दल काय विचार करतो आणि त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट झाली . मोहम्मद शमीला नंतर या सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आले. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर, आता तो हसीन जहाँपासून वेगळा राहतो.”

हेही वाचा: WPL 2023: अरेरे, इज्जतीचा फालुदा! स्मृती मंधानाचा पगार बाबर आझमपेक्षा दुप्पट; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

हसीन जहाँने शमीवर आरोप केला होता की शमीने पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतले होते. यानंतर शमीचा बीसीसीआयचा केंद्रीय करारही गेला आणि या आरोपांची चौकशी करण्यात आली. या सर्व आरोपातून शमीची निर्दोष मुक्तता झाली असली तरी. हे वर्ष शमीसाठी कठीण गेले असले तरी त्यानंतर त्याने क्रिकेटच्या मैदानावर दमदार पुनरागमन केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2023 at 14:39 IST

संबंधित बातम्या