Abhishek Sharma- Ishan Kishan Viral Video: भारताचे २ संघ एकाचवेळी २ वेगवेगळ्या मालिका आणि स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला भारतीय संघ जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान हा सामना पाहण्यासाठी जपानमध्ये असलेल्या इशान किशन आणि अभिषेक शर्माने केलेल्या देसी जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही जोडी आपल्या हॉटेल रूममध्ये खास गप्पा मारताना दिसून येत आहे. दोघेही स्क्रीनवर सुरू असलेल्या पिक्सलेटेड कॉमेंट्रीवर खळखळून हसताना दिसून येत आहेत. दोघांनाही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचा थरार सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी दोघांनी यूट्यूबवरील पिक्सलेटेड कॉमेंट्री सुरू केली. यादरम्यान ते प्रसिध कृष्णाची नक्कल करताना दिसून आले. या देसी जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजने उभारला धावांचा डोंगर
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जॉन कँम्पबेलने सर्वाधिक ६२ आणि जस्टीन ग्रीव्ह्सने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. तर केसी कार्टीने १३, शे होपने १२ आणि आमिर जंगूने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर रोस्टन चेसने २४ धावा केल्या. यासह वेस्ट इंडिजने ५० षटकांअखेर ७ गडी बाद २९५ धावा केल्या.
भारत- अफगाणिस्तान क्वार्टर फायनलमध्ये भिडणार
आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरूवात झाली आहे. पण भारतीय संघ अजूनही आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. भारतीय संघ २८ सप्टेंबरला क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ अफगाणिस्तानचा सामना करताना दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत अफगाणिस्तानचा ३-० ने पराभव केला होता. या सामन्यातही भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
