Sunrises Hyderabad New Captain for IPL 2026: आयपीएलचा १९ वा हंगाम आता काही दिवसांनी सुरू होत आहे. येत्या २८ मार्चपासून आयपीएल २०२६ ला सुरूवात आहे. बीसीसीआयकडून स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. स्पर्धेपूर्वी सर्व संघांनी सरावाला सुरूवात केली आहे. पण दुखापतींचा काही संघांना फटका बसला आहे, या पार्श्वभूमीवर आता सनरायझर्स हैदराबाद संघाने नव्या खेळाडूवर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

खेळाडूंच्या दुखापतींचा आयपीएल संघांना मोठा धक्का बसला आहे. या संघांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचाही समावेश आहे. सनरायझर्स संघाचा कर्णधार पॅट कमिन्स गेला बराच काळ दुखापतीशी झुंजत आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२६ मधील सुरूवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. पॅट कमिन्स हा हैदराबाद संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे कमिन्स फिट होईपर्यंत हैदराबाद संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ हंगामासाठी कर्णधाराची घोषणा केली आहे. इशान किशनची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किशनने नुकतेच २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. इशान व्यतिरिक्त अभिषेक शर्मालाही महत्त्वपूर्ण भूमिका देण्यात आली आहे. त्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन कर्णधाराची घोषणा केली.

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कोण करणार सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्त्व?

गेल्या हंगामापर्यंत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स संघाचे कर्णधारपद भूषवत होता, पण या हंगामात तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे, संघाने कर्णधारपदाची सूत्रे इशान किशनकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्स संघात सामील होताच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल. इशान किशन २०२४ पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता, पण तो २०२५ च्या लिलावात हैदराबाद संघात सामील झाला.

सनरायझर्स हैदराबाद आपल्या आयपीएल २०२६ मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजी करेल. त्यांचा पहिला सामना बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध असणार आहे. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आपल्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करेल.

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), अनिकेत वर्मा, आर स्मरण, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलील अरोरा, शाकिब हुसैन, ओमकार तरमळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेरा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स