Ishan Kishan Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेची दमदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून संघाचा नवा कर्णधार इशान किशनने मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
पहिल्याच सामन्यात इशान किशनचा धमाका
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी यावं लागलं. पण हैदराबादला हवी तशी सुरुवात करता आली नाही. संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. बंगळुरूचं मैदान छोटं आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडकडून चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण ही जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी मिळून संघाचा डाव सांभाळला. यादरम्यान इशान किशनने ३००० धावांचा पल्ला गाठला आहे. यादरम्यान आयपीएलमध्ये सर्वात वेगवान ३००० धावा करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. इशान किशनने २१८० चेंडूत ३००० धावांचा पल्ला गाठला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हा रिषभ पंतच्या नावावर आहे. रिषभ पंतने २०२८ चेंडूत ३००० धावा पूर्ण केल्या होत्या.
आयपीएलमध्ये ३००० धावा पूर्ण करण्यासाठी घेतलेले सर्वात कमी चेंडू (भारतीय खेळाडू):
२०२८ चेंडू – ऋषभ पंत</p>
२०८२ चेंडू – युसूफ पठाण
२१३० चेंडू – सूर्यकुमार यादव
२१३५ चेंडू – सुरेश रैना
२१५२ चेंडू – एम.एस. धोनी
२१८० चेंडू – इशान किशन*
२२०३ चेंडू – के.एल. राहुल
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांअखेर ९ गडी बाद २०१ धावा केल्या. हैदराबादकडून फलंदाजी करताना इशान किशनने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. तर अनिकेत वर्माने ४३ धावा केल्या आणि हेनरिक क्लासेनने ३१ धावांची खेळी केली.
